Tue, Apr 23, 2019 06:38होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कोणाच्या लग्नासाठी श्रीदेवी दुबईला गेल्या होत्या?

कोणाच्या लग्नासाठी श्रीदेवी दुबईला गेल्या होत्या?

Published On: Feb 25 2018 9:48AM | Last Updated: Feb 25 2018 9:48AMमुंबई: पुढारी ऑनलाईन

बॉलिवूडच्या सुपरस्टार अभिनेत्री श्रीदेवी यांचे शनिवारी रात्री दुबईत निधन झाले. एका लग्न  समारंभासाठी त्या दुबईत केल्या होत्या. त्यावेळी आलेल्या हृदयविकाराच्या धक्क्याने त्याचे निधन झाले. श्रीदेवी यांच्यासोबत या कार्यक्रमासाठी त्याचे पती बोनी कपूर,आणि मुलीसुद्धा गेल्या होत्या. 

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

मोहित मारवाह यांच्या लग्न सोहळ्यासाठी श्रीदेवी दुबईला गेल्या होत्या. चित्रपट दिग्दर्शक सुरिंदर कपूर नात आणि नोयडा फिल्म सिटीचे संस्थापक संदीप मारवाह यांचा मुलगा मोहित यांचा विवाह दुबई आयोजित करण्यात आला होता. मोहित बोनी कपूर यांचे भाचे आहेत. तर अर्जुन कपूर आणि सोनम कपूर यांचे चुलत भाऊ आहेत. 

Viral: हवाहवाईचा अखेरचा व्हिडिओ

श्रीदेवी यांच्या सोबत या विवाहासाठी संजय कपूर देखील दुबईला गेले होते. विवाह सोहळा झाल्यानंतर रात्री 12 वाजता ते दुबईहून मुंबईला आले. मात्र मुंबईत पोहोतचाच त्यांना श्रीदेवी यांच्या निधनाचे वृत्त कळाले. त्यामुळे ते पुन्हा दुबईला रवाना झाले. श्रीदेवी यांचे पार्थिव दुबईहून मुंबईला आणण्याची तयारी सुरु आहे. त्यांचे पार्थिव नेमके कधी मुंबईत आणले जाईल यांची माहिती अद्याप मिळू शकली नाही. 

...आणि आईची इच्छा अपूर्णच राहिली