Mon, Apr 22, 2019 16:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नायगावमधील बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रक्रियेला येणार गती

नायगावमधील बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रक्रियेला येणार गती

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी 

नायगाव, ना. म. जोशी मार्गावरील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला म्हाडाने सुरुवात केली आहे. नायगावसोबत ना.म.जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासात कशी घरे तयार होतील हे दाखवण्यासाठी तेथील नमुना सदनिकेचे उद्घाटनही करण्यात आले. नायगाव येथील पाचव्या टप्प्यातील सर्वेक्षणाचे काम पूर्ण  झाले असून आता लवकरच पात्रतेसंबंधीचा अध्यादेश आल्यावर उर्वरीत टप्प्यांतील सदनिकांचेही सर्वेक्षण पूर्ण करण्यात येणार आहे. यामुळे नायगावमधील बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रक्रियेला गती येणार आहे. 

वरळी, नायगाव, ना. म. जोशी मार्गावरील बीडीडी चाळींचा भूमिपूजन सोहळा एप्रिल महिन्यात पार पडला. यातील नायगाव आणि ना. म. जोशी मार्गावरील बीडीडी चाळींच्या कामासाठी म्हाडाने कंत्राटदारांची नेमणूक केली असून येथे प्राथमिक कामे सुरू झाली आहेत. तसेच वरळी बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाची निविदा अंतिम टप्प्यात आली आहे. 

सरकारने बीडीडीवासीयांना 500 चौरस फुटांचे घर देण्याची घोषणा केली असली, तरी रहिवाशांना कॉर्पस फंड किती देणार, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. यामुळे रहिवासी आणि संघटनांनी पुनर्विकासाला विरोध दर्शवत नायगाव, ना. म. जोशी मार्गावर होणारे बायोमेट्रिक सर्वेक्षण उधळून लावले होते, मात्र आता बहुतांश विरोध मावळला असून पात्रतेबाबतचा अध्यादेश लवकरच येणार आहे. हा अध्यादेश आल्यावर बहुतांश रहिवासी पात्र होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील प्रक्रियेला वेग येणार आहे. 

Tags : mumbai news, redevelopment, BDD tenement, Speed, Naigaon,


  •