Tue, Jul 23, 2019 04:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वेतर्फे विशेष गाड्या 

महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वेतर्फे विशेष गाड्या 

Published On: Dec 04 2017 1:58AM | Last Updated: Dec 04 2017 1:34AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथे आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने येतात. गर्दीचे नियोजन आणि प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने महापरिनिर्वाण दिनानिमित्त 11 विशेष एक्स्प्रेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (3 विशेष), छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/दादर ते सेवाग्राम-अजनी-नागपूर (6 विशेष) आणि सोलापूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (2 विशेष) अशा मार्गांवर विशेष एक्स्प्रेस चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी वैध तिकिटांनी प्रवास करावा, असे आवाहनही मध्य रेल्वेने केले आहे. या गाड्यांचा लाभ मध्य प्रदेश तसेच कर्नाटकातून येणार्‍या नागरिकांंना होणार आहे. नागपूर-छत्रपती शिवाजी टर्मिनस विशेष एक्स्प्रेस विशेष गाडी क्रमांक 01262 नागपूर येथून 4 डिसेंबर रोजी 23.55 वाजता सुटेल. विशेष गाडी क्रमांक 01264 नागपूर येथून 5 डिसेंबर रोजी 07.50 वाजता सुटेल. 

तसेच विशेष गाडी क्रमांक 01266 नागपूर येथून 5 डिसेंबर रोजी दुपारी 15.55 वाजता सुटेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/दादर-सेवाग्राम/अजनी/नागपूर विशेष एक्स्प्रेस विशेष गाडी क्रमांक 01249 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून 6 डिसेंबर रोजी दुपारी 16.05 वाजता सुटेल. विशेष गाडी क्रमांक 01251 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून 6 डिसेंबर रोजी सायंकाळी 18.40 वाजता सुटेल.

विशेष गाडी क्रमांक 01253 दादर येथून 7 डिसेंबर रोजी (6 डिसेंबरच्या मध्यरात्री) 00.40 वाजता सुटेल. विशेष गाडी क्रमांक 01255 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून 7 डिसेंबर रोजी 12.35 वाजता सुटेल.

विशेष गाडी क्रमांक 01257 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून 8 डिसेंबर रोजी 18.40 वाजता सुटेल. विशेष गाडी क्रमांक 01259 दादरवरून 8 डिसेंबर (7 डिसें.च्या मध्यरात्री) 00.40 वाजता सुटेल.