Fri, Dec 13, 2019 18:00होमपेज › Mumbai-Thane-Raigad › खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरना एनआयए न्यायालयाकडून पुन्हा झटका 

खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरना एनआयए न्यायालयाकडून पुन्हा झटका 

Published On: Jun 20 2019 2:54PM | Last Updated: Jun 20 2019 2:54PM
मुंबई  : पुढारी ऑनलाईन

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आणि भारतीय जनता पक्षाच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना विशेष राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) न्यायालयाने चांगलाच झटका दिला. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सुनावणी सुरू असल्याने आरोपी असलेल्या साध्वींना न्यायालयात आठवड्यातून एकदा उपस्थित राहण्यासाठी सक्तीने आदेश देण्यात आले आहेत. या निर्णयाविरोधात त्यांनी याचिका दाखल करत कायमची सुटका करण्यात यावी अशी मागणी केली होती. 

आता खासदार असल्याने संसदेत संसदीय कामकाजासाठी दैनंदिन उपस्थिती आवश्यक असल्याने आठवड्यातून एकदा हजर राहता येणार नाही, त्यामुळे सुनावणीमधून सुटका करावी अशी मागणी याचिकेतून केली होती. न्यायालयाने ही मागणी साफ फेटाळून लावताना सुनावणीसाठी उपस्थिती लावण्याचे आदेश दिले. दरम्यान, केवळ आजच्या सुनावणीसाठी उपस्थित न राहण्यासाठी परवानगी साध्वींना दिली.