Sat, Jan 19, 2019 20:02होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सचिनला वाढदिवसाची अनोखी भेट

सचिनला वाढदिवसाची अनोखी भेट

Published On: Apr 24 2018 9:37AM | Last Updated: Apr 24 2018 9:37AMमालाड : भारतामध्ये क्रिकेटवेडे लोक राहतात. अनेक चाहते सचिनला तर या खेळातील देव मानतात. अशाच एका कांदिवलीतील रवी राजू पुजारी या चाहत्याने सचिनसाठी बॅट बनवली आहे. तो उद्या सचिनच्या वाढदिवसाला ही बॅट भेट देणार आहे. कांदिवली पश्‍चिमेतील साईनगर येथे चहा विकणारा रवी पुजारी हा मंगळवारी सचिनच्या वाढदिवसाला ही बॅट गिफ्ट देणार आहे.

महिन्याला जेमतेम 8 ते 10 हजार रुपये कमावणार्‍या रवीने 1.65 मीटरची लाकडाची बॅट बनवली आहे. तो ही बॅट घेऊन वानखेडे स्टेडियमच्या प्रवेशद्वाराजवळ जाऊन सचिनला देण्याचा प्रयत्न करणार आहे. आयपीएल सीझन सुरू असून मुंबई इंडियन्सचा सामना असल्याने सचिन वानखेडे स्टेडियमवर असणार आहे. त्यामुळे मी प्रयत्न करेन, यश मिळेल, याची खात्री नाही, असे रवी म्हणाला.

Tags : Sachin Tendulkar, Special Gift