Sun, Jul 21, 2019 01:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मोबाईलवर मोठ्याने बोलल्याने दोघांवर हल्ला 

मोबाईलवर मोठ्याने बोलल्याने दोघांवर हल्ला 

Published On: Apr 18 2018 1:40AM | Last Updated: Apr 18 2018 12:59AMमुंबई : प्रतिनिधी

मोबाईलवर हळू बोलण्यावरुन चारजणांच्या एका टोळीने दोन तरुणांना बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री उशिरा बोरिवली परिसरात घडली. याप्रकरणी चारही आरोपींविरुद्ध एमएचबी पोलिसांनी गंभीर दुखापतीचा गुन्हा नोंदवून याच गुन्ह्यांत दोन आरोपींना अटक केली आहे. 

संतोष शंकर वायदंडे हा तरुण शनिवारी त्याच्या एका मित्रासोबत बोरिवलीतील एल. एम. रोडवरील शिवाजीनगर, गावदेवी मैदानात मोबाईलवर बोलत होता. मोबाईलवर बोलताना त्याचा आवाज मोठा होता, त्याच्यामुळे इतरांना त्रास होत असल्याने तिथे चारजणांच्या एका टोळीने त्याला मोबाईलवरुन हळू बोलण्यास सांगितले. याच कारणावरुन त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली आणि रागाच्या भरात या चौघांनी संतोषसह त्याच्या मित्राला बेदम मारहाण केली. लाथ्याबुक्यांनी तसेच लोखंडी रॉडने मारहाण केल्याने ते दोघेही जखमी झाले. जखमीना तातडीने स्थानिक रहिवाशांनी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. संतोषच्या उजव्या पायाला तर त्याच्या मित्राच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेची माहिती मिळताच एमएचबी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी संतोष वायदंडे याच्या तक्रारीवरुन चारही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून  पळून गेलेल्यातील दोघांना नंतर पोलिसांनी अटक केली.

Tags : Mumbai, Speaking loud on the mobile, attack on Two, Mumbai news,