Tue, Apr 23, 2019 07:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › धार्मिक उत्सवात स्पीकरचा आवाज बंदच

धार्मिक उत्सवात स्पीकरचा आवाज बंदच

Published On: Jun 27 2018 2:12AM | Last Updated: Jun 27 2018 2:03AMमुंबई : प्रतिनिधी

धार्मिक सण उत्सव जवळ आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारची याचिका  फेटाळल्याने ध्वनिप्रदूषणा संदर्भात दिलेल्या आदेशाची अंमल बजावणी करा. आवाजाचे प्रदूषण होणार नाही याची खबरदारी घ्या. कायद्याचे उल्लंघन करणार्‍या विरोधात कारवाईचा बडगा उगारा. अन्यथा अवमान कारवाईला समोरे जा, अशी तंबी उच्च न्यायालयाने आज राज्य सरकारला दिला.

न्यायालयाच्या आदेशानंतरही कारवाई करण्यास राज्य सरकारकडून टाळाटाळ होत असल्याने न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. यापुढे असे खपून घेतले जाणार नाही. नियमांचे उल्लंघन करणार्‍यांविरोधात कारवाईचा बडगा उगारा अन्यथा कारवाई केली जाईल असे बजावले.

विविध उत्सवाच्या निमित्ताने होणार्‍या ध्वनिप्रदूषण आणि रस्त्यावरील बेकायदा मंडपाच्या पार्श्‍वभूमीवर आवाज फाऊंडेशन आणि ठाण्याचे डॉ. महेश बेडेकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. त्या याचिकेवर न्यायमूर्ती अभय ओक आणि रियाझ छागला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी याचिकाकर्त्यांनी न्यायालयाच्या आदेशाची अंमल बजावणी होत नाही. नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई होत नसल्यावा आरोप केला. त्यावेळी न्यायालयाने राज्य सरकारला समज दिली.