Tue, May 26, 2020 14:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सावरकर गौरव प्रस्ताव विधानसभाध्यक्षांनी फेटाळला

सावरकर गौरव प्रस्ताव विधानसभाध्यक्षांनी फेटाळला

Last Updated: Feb 26 2020 1:11PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृतीदिनी विधानसभेत वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधी पक्ष भाजपकडून सावरकरांचा गौरव प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न केला. हा प्रस्ताव विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी फेटाळला. त्यामुळे भाजपने आक्रमक भूमिका घेत घोषणाबाजी केली. सावरकरांचा मुद्दा घेऊन भाजपने शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न भाजपने केला. 

अधिक वाचा : स्वातंत्र्यवीर सावरकरांवरून अजित पवार म्हणाले..

संसदीय मंत्री अनिल परब यांनी आधी सावरकरांना भारतरत्न द्या आम्ही अभिनंदनाचा प्रस्ताव मांडतो असे सांगत भाजपला प्रत्युत्तर दिले. गौरव प्रस्ताव फेटाळल्याने भाजपकडून बॅनरबाजी करण्यात आली. यावेळी विधानसभाध्यक्षांनी बॅनरबाजी करू नये असे सुनावले.  भाजप आमदारांनी वेलमध्ये येऊन घोषणाबाजी केली. 

राज्य, देश उभारणीत ज्यांचे मोलाचे योगदान आहे त्यांचा आदर करावा. चांगल्या व्यक्तीच्या संदर्भात जर एखादी चर्चा येणार असेल तर त्याबाबत कोणालाही आक्षेप घेण्याचे कारण नाही. ज्या व्यक्ती हयात नाहीत अशा व्यक्तींबद्दल अनावश्यक विधाने करून गैरसमज पसवण्याचे काही काम नाही. सावरकरांचे योगदान नाकारता येणार नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

अधिक वाचा : मीरा भाईंदरच्या महापौरपदी भाजपच्या ज्योत्स्ना हसनाळे यांची निवड

तसेच, विरोधकांनी काय करावे हा त्यांचा अधिकार आहे. आम्हाला सभागृह चालवायचे आहे. सभागृहात काम होणे महत्त्वाचे आहे. काल विरोधक सभागृहात गोंधळ घालत होते परंतु आम्ही एक विधेयक मंजुर करून घेतले. विधेयक मंजूर होणेही महत्त्वाचे असते असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.