Thu, Sep 20, 2018 10:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › न्यायाधिशांना कोर्टातच चावला साप

न्यायाधिशांना कोर्टातच चावला साप

Published On: Sep 04 2018 4:37PM | Last Updated: Sep 04 2018 4:37PMपनवेल : प्रतिनिधी 

पनवेल न्यायालयाचे न्यायाधिश सी. पी. काशीद यांना आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कोर्टात साप चावल्याची घटना घडली आहे. धामण जातीचा साप असल्याचे सांगितले जात आहे. सर्प मित्र वकिल दीपक ठाकूर यांनी स्वतः हा साप पकडला.

आज सकाळी नेहमी प्रमाणे न्यायाधीश सी. पी. काशीद नेहमी प्रमाणे कोर्टात आले होते. कोर्टात आल्या नंतर दालनात बसल्याच्या काही वेळातच न्यायाधिश काशीद यांच्या हाताला साप चावला आणि न्यायालयाच्या आवारात एकच गोंधळ सुरू झाला. या घटनेची माहिती, वकिल आर.के.पाटील यांना मिळताच त्यांनी सर्प मित्र वकिल दीपक ठाकूर यांना याबाबत माहिती दिली. ठाकूर यांनी तो साप ताब्यात घेतला. 

दरम्‍यान, हा साप बिनविषारी असल्याचे समजल्या नंतर न्यायाधिश आणि इतर वकिलांचा जीव मुठीत आला.