Sun, Apr 21, 2019 13:46होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आता स्मार्टकार्डवर कुटुंबासह एसटी प्रवास

आता स्मार्टकार्डवर कुटुंबासह एसटी प्रवास

Published On: Dec 07 2017 8:10AM | Last Updated: Dec 07 2017 8:10AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

विशिष्ट रक्कम भरून घेतलेले स्मार्ट कार्ड आपल्या बरोबरच कुटुंबातील व्यक्ती व इतरांनाही प्रवासासाठी वापरता येईल, अशी सुविधा देणारी कॅशलेस स्मार्ट कार्ड योजना 1 मेपासून एसटीच्या प्रवाशांना उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री तथा, एसटी महामंडळाचे अध्यक्ष, दिवाकर रावते यांनी केली आहे.

या योजनेंतर्गत प्रवाशांना50 रुपयांचे स्मार्ट कार्ड घेऊन त्यावर सुरुवातीला किमान 500 रुपये इतकी रक्कम भरणे आवश्यक आहे. त्यानंतर पुनर्भरणा रक्कम ही रु.100 रुपयाच्या पटीत उपलब्ध असेल. या योजनेचा लाभ प्रवाशांना येत्या 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिनापासून प्रत्येक आगारात जाऊन घेता येईल. ठराविक रकमेचे स्मार्ट कार्ड घेऊन त्याद्वारे त्या रकमेइतका एसटीचा कोणताही (साधी, रातराणी, हिरकणी, शिवशाही, शिवनेरी व एशमेध बसेस) प्रवास करणे आता प्रवाशांना शक्य होणार आहे. त्यामुळे खिशात सुट्टे पैसे आहेत की नाहीत, याची चिंता करण्याची गरज नाही.

विशेष म्हणजे हे स्मार्ट कार्ड एका व्यक्तीने काढले तरी त्याच्या कुटुंबातील व मित्रांपैकी कोणीही प्रवासाला जाताना हे कार्ड वापरू शकतो. तसेच कितीही व्यक्तींची तिकिटे काढली जाऊ शकतात.