Tue, Jan 22, 2019 14:50
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणे : रुग्णवाहिका अपघातात ६ जखमी

ठाणे : रुग्णवाहिका अपघातात ६ जखमी

Published On: Apr 08 2018 1:23PM | Last Updated: Apr 08 2018 1:23PMठाणे : प्रतिनिधी 

मालेगावहून मुंबईला जाणाऱ्या रुग्णवाहिकेला इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील आनंदनगर ऑक्ट्रॉय नाका येथे अपघात झाला. सकाळी ७ च्या सुमारास झालेल्या या अपघातात रुग्णवाहिकेतील सहा जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी मुंबईमधील राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये एका गरोदर महिलेचा समावेश आहे. रुग्णवाहिका पलटी  झाल्यामुळे हा अपघात झाला. 

अलिदा अब्दुल रफिक (६५ ) या महिला रुग्णासोबत पाच जण मालेगाववरून मुंबईला निघाले होते. सकाळी आंदनगर ऑक्ट्रॉय नाका येथे रुग्णवाहिका आल्यानंतर या ठिकाणी असलेल्या दुभाजकाला धडकल्याने ती पलटी झाली. यामध्ये सहा जण जखमी झाले आहेत. पहाटेपासून गाडी चालवत असल्याने वाहनचालकाचा तोल गेल्याने हा अपघात झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

अपघात झाल्यानंतर पोलिस अधिकारी, फायर ब्रिगेड तसेच महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी तात्काळ उपास्थित झाले. जखमींपैकी अखिल अहमद (३३) असे वाहनचालकाचे नाव असून त्यांच्या चेहऱ्याला मार लागला आहे. मुस्ताक अहमद ( ४०) याच्या उजव्या  हाताला मार लागला आहे. शक्तीला मुश्ताक अहमद (३५) ही एक महिन्याची गरोदर असून  तिला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. 

सुकर शेख (५०) याला उजव्या पायाला आणि उजव्या हात फ्रॅक्चर झाला आहे . मोहम्मद शबाब (१८) या मुलाला चेहऱ्यावर जखम झाली आहे. सर्व राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. कोपरी पोलिस ठाण्यात यासंदर्भात अपघातांची नोंद करण्यात आली आहे. 

Tags : ambulance, thane, thane news