Sun, Feb 23, 2020 16:14होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सहा आयआयटीयन्सना दोन लाख दहा हजार अमेरिकन डॉलर्सचे पॅकेज

सहा आयआयटीयन्सना दोन लाख दहा हजार अमेरिकन डॉलर्सचे पॅकेज

Published On: Dec 22 2017 1:28AM | Last Updated: Dec 22 2017 12:47AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

गलेलठ्ठ पगारासाठी प्रसिद्ध असलेल्या मुंबई आयआयटी प्लेसमेंटचा पहिल्या टप्यात तब्बल 1100 विद्यार्थ्यांना नोकर्‍या मिळाल्या आहेत तर यातून 74 आयआयटीयन्सना परदेशात नोकरी मिळाली आहे. मायक्रोसॉफ्टने सहा आयआयटीयन्सना वार्षिक दोन लाख दहा हजार अमेरिकन पॅकेज दिले आहे.

आयआयटी मुंबईच्या पवई कॅम्पसमध्ये गेल्या 1 डिसेंबरपासून कॅम्पस प्लेसमेंटला प्रारंभ झाला होता. 16 डिसेंबरपर्यंत सुरु असलेल्या प्लेसमेंटमध्ये तब्बल 310 कंपन्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये आत्तापर्यन्त सॅमसंग कंपनीने गेल्या 3 वर्षांतील सर्वाधिक ऑफर विद्यार्थ्यांना दिली आहे. या कंपनीने या वर्षी कोरिया, बेंगळुरु, हैदराबाद आदी केंद्रावर 45 आयआयटीयन्सची निवड केली आहे. यंदाच्या भरती प्रक्रियेत गेल्या काही वर्षाच्या तुलनेत आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग वाढलेला दिसून आला. आंतरराष्ट्रीय पातळीवरील बॅ्रण्डनी आयआयटी बॉम्बेमधून तब्बल 74 विद्यार्थ्यांची निवड केली. मायक्रोसॉफ्टने सहा आयआयटीयन्सना वार्षिक दोन लाख दहा हजार अमेरिकन डॉलर्सचे पॅकेज दिले आहे.

उबरने एका विद्यार्थ्याला दीड लाख अमेरिकन डॉलर तर, ऑफ्टिव्हर या कंपनीे वार्षिक एक लाख युरो इतके वेतन दिले आहे. मर्करी या कंपनीने पाच जणांना साठ लाख जपानी येन इतके वेतन दिले आहे. भारतात ब्लॅकस्डोन या कंपनीने 45 लाखांंचे वेतन दिले आहे.

एकूण प्लेसमेंटमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरील 38 कंपन्या सहभागी झाल्या होत्या. पहिल्या टप्प्यात एकूण 1 हजार 11 विद्यार्थ्यांना नोकर्‍या मिळाल्या आहेत. यावेळी विविध क्षेत्रातील एकूण 310 कंपन्या भरती प्रक्रियेत सहभागी झाल्या होत्या.  ऑप्टिमायर्स, मायक्रोसॉफ्ट, मर्चरी, सॅमसंग कोरिया अशा कंपन्यांनी विद्यार्थ्यांना ऑफर्स देऊ केल्या. गेल्यावर्षी 65 ऑफर्स मिळाल्या होत्या.