Fri, Apr 19, 2019 12:17होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बचना है तो मेरे दोस्त, आओ खेले मेंढीकोट!

बचना है तो मेरे दोस्त, आओ खेले मेंढीकोट!

Published On: Apr 23 2018 1:58AM | Last Updated: Apr 23 2018 1:47AMधारावी : अरविंद कटके

मुंबईतील काही भागातील भिंतींवरील  ‘बचना है तो ऐ मेरे दोस्त, आओ खेले मेंढीकोट’ हे शब्द  नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. भित्तीचित्र रेखाटणार्‍या ग्रॅफिटी टोळीला पकडण्यासाठी पोलीस, पालिका प्रशासनाने दोन वर्षांपासून प्रयत्न करूनही काहीच हाती लागले नाही. या सांकेतिक संदेशांमुळे मुंबईकर मात्र कोड्यात पडले आहेत.  

बांद्रा, माहीम, माटुंगा, दादर चौपाटी, सेनापती बापट मार्ग चुनाभट्टी, घाटकोपर, टिळकनगर भागातील नेमक्या कॉलेजसमोरील अनेक भिंती अशा संदेशाने रंगल्या आहेत. गेल्या दोन वर्षांपासून या ग्रॅफिटी टोळीला पकडण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. 

आता माटुंग्याच्या सेनापती बापट मार्गावर तसेच माहीम रेल्वेस्थानकालगतच्या काही भिंती काळ्या रंगात ‘मिसिंगगर्ल’ मुलीचे फोटो असलेल्या संदेशाने रंगवण्यात आल्या आहेत. कठुआ बलात्कार घटनेशी या चित्राचा संबंध असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तर मेंढीकोट यातील मेंढी हा शब्द अमली पदार्थ एम.डी.शी मेळखात असल्याने यातून अमली पदार्थांच्या उपलब्धतेविषयी संदेश असावा असे म्हटले जाते. तर काहींनी तिथे तृतीयपंथीयांचा अड्डा असावा, असा अंदाज व्यक्त केला. या टोळीला पकडण्यासाठी मुंबई पोलिसांनी मध्यंतरी या भिंतींलगत पाळत ठेवली होती. 

भिंतींवरील सांकेतिक संदेशांमुळे मुंबईकर कोड्यात

आता  ‘मिसिंगगर्ल’ संदेशातून या टोळीला नेमके काय सांगायचे आहे. हा प्रश्न माहीम-माटुंग्यातील तरुणींना पडला आहे.  या संदेशामुळे या भिंतीजवळून जाताना भीती वाटते. याचा अर्थ काय हे समजत नाही. पोलिसांनी या  टोळीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी तरुणींनी केली. 

Tags : Mumbai, Sign message, on wall, Mumbai news,