Wed, Sep 26, 2018 12:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सिद्धिविनायक आजपासून चार दिवसांच्या सुट्टीवर

सिद्धिविनायक आजपासून चार दिवसांच्या सुट्टीवर

Published On: Jan 10 2018 1:58AM | Last Updated: Jan 10 2018 12:15AM

बुकमार्क करा
मुंबई: प्रतिनिधी

प्रभादेवी येथील सिद्धीविनायक गणपतीचे दर्शन १० ते १४ जानेवारी या दिवशी बंद राहणार आहे. माघी गणेशोत्सवनिमित्त सिंदूर लेपन करण्यात येणार आहे. त्यामुळे या काळात भाविकांना सिद्धीविनायकाचे थेट दर्शन घेता येणार नाही परंतु, या कालावधीत भाविकांना गणपतीच्या प्रतिमूर्तीचे दर्शन घेता येईल. सोमवारी १५ जानेवारी रोजी गणेशमूर्तीचे पूजन आणि आरती झाल्यानंतर दुपारी एक वाजता भाविकांना नेहमीप्रमाणे गाभार्‍यातून दर्शन घेता येईल, अशी माहिती सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी दिली आहे.