Mon, Jan 21, 2019 01:24होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सिद्दीकींची ४६२ कोटींची मालमत्ता ‘ईडी’कडून जप्‍त

सिद्दीकींची ४६२ कोटींची मालमत्ता ‘ईडी’कडून जप्‍त

Published On: Apr 08 2018 2:13AM | Last Updated: Apr 08 2018 1:55AMमुंबई : प्रतिनिधी

राष्ट्रीय काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांना झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील (एसआरए) घोटाळ्यात सक्‍तवसुली संचालनालयाने (ईडी) दणका देत, त्यांची मुंबईतील तब्बल 462 कोटींची संपत्ती जप्त केली आहे. ‘ईडी’ने काळ्या पैशांविरोधातील पीएमएलए कायद्यांतर्गत शुक्रवारी ही कारवाई केली असून, येत्या काळात बाबा सिद्दीकींच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे.

वांद्रे पश्‍चिमेकडील रेक्लमेशनजवळ असलेल्या जमात-ए-जमुरिया झोपडपट्टी परिसरात आलिशान फ्लॅट्स बांधून करोडो रुपयांचा घोटाळा करण्यात आल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली होती. 400 कोटी रुपये किमतीच्या एसआरए योजनेच्या कागदपत्रांमध्ये फेरफार करून कोट्यवधींचा घोटाळा करण्यात आल्याचा आरोप बाबा सिद्दीकी यांच्यावर आहे. बांधण्यात आलेल्या अपार्टमेंटमधील फ्लॅटची विक्री करून तब्बल 1 हजार 800 ते दोन हजार कोटी रुपयांची कमाई करण्यात आल्याची माहिती तपास यंत्रणेच्या हाती लागल्यानंतर जप्तीची ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. मे. पिरॅमिड डेव्हलपर्सच्या ताब्यात असलेले 33 आलिशान फ्लॅट जप्त केले आहेत.

Tags : mumbai, mumbai news, Siddiquis assets, worth, 462 crores, seized, ED,