Tue, Apr 23, 2019 02:24होमपेज › Mumbai-Thane-Raigad › स्व. श्रीकांत ठाकरेंना ‘मोहम्मद रफी जीवन गौरव’

स्व. श्रीकांत ठाकरेंना ‘मोहम्मद रफी जीवन गौरव’

Published On: Dec 21 2017 2:10AM | Last Updated: Dec 21 2017 1:24AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी 

ज्येष्ठ संगीतकार स्व.श्रीकांत ठाकरे यांना यंदाचा मोहम्मद रफी जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. गायिका पूनम श्रेष्ठा यांना मोहम्मद रफी पुरस्कार देण्यात येईल, अशी घोषणा कार्यक्रमाचे आयोजक स्पंदन आर्ट या संस्थेतर्फे मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशीष शेलार यांनी केली. रफी यांच्या जयंतीनिमित्त या पुरस्कारांचे वितरण केले जाते. यंदाचे पुरस्कारांचे दहावे वर्ष आहे. 

रफी यांच्या जयंतीदिवशी 24 डिसेंबरला वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात सायंकाळी पाच वाजता उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू व राज्यपाल सी.विद्यासागर राव यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येईल. यावेळी  प्रसाद महाडकर यांच्या जीवनगाणीतर्फे रफी यांच्या गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 

 रफी यांच्यासोबत काम केलेल्या व्यक्तीला जीवन गौरव पुरस्काराने गौरवण्यात येते. त्यामध्ये  एक लाख रुपयांचा धनादेश व स्मृतिचिन्ह यांचा समावेश असतो.  51 हजार रुपयांचा धनादेश व स्मृतिचिन्ह देऊन रफी पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. श्रीकांत ठाकरे यांना मरणोत्तर जाहीर झालेला हा पुरस्कार त्यांच्या पत्नी मधुवंती ठाकरे   स्वीकारतील, अशी माहिती शेलार यांनी दिली.