होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गिरणी कामगारांच्या घरांसाठी जमीन दाखवा

गिरणी कामगारांच्या घरांसाठी जमीन दाखवा

Published On: Jan 12 2018 1:54AM | Last Updated: Jan 12 2018 1:02AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी 

गिरणी कामगारांच्या घरासाठी जमीन दाखवण्याचे आदेश महसूल विभागाच्या प्रधान सचिवांनी जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत. अर्ज केलेल्या सर्व गिरणी कामगारांना घरे मिळण्यासाठी जमीन उपलब्ध व्हावी, यासाठी हे निर्देश देण्यात आले आहेत. 

1 लाख 70 हजार गिरणी कामगारांनी म्हाडाकडे घरांसाठी अर्ज केले होते, या सर्व कामगारांना घरे मिळावीत याकरता भूखंड उपलब्ध व्हावेत, यासाठी शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. तसेच आदेशच प्रधान सचिवांनी सर्व जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत. गिरणी कामगारांना तीनवेळा म्हाडाच्या सोडतीच्या माध्यमातून घरे देण्यात आली आहेत. मात्र तेवढी पुरेशी नाहीत. 1 लाख 70 हजार गिरणी कामगारांच्या घरांसाठी राज्यभरात गृहनिर्माण प्रकल्प राबवण्याची गरज स्पष्ट करण्यात आली आहे. 

त्यासाठी 6 ऑक्टोबर 2017 रोजी महाराष्ट्राचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली गिरणी कामगारांच्या प्रश्नावर गठित झालेल्या समितीची बैठक पार पडली होती. मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) शासकीय जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले होते. त्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात होता. 

या जागांचे आरेखन करून पूर्ण अहवाल शासनाला सादर करण्यात येईल, असेही बैठकीत सांगण्यात आले असून या वेळेस कृती संघटनेच्या जयश्री खाडीलकर, प्रवीण घाग, जयप्रकाश भिलारे, नंदू पारकर, निवृत्ती देसाई व अण्णा शिर्सेकर उपस्थित होते. तसेच एमएमआरडीए, मुंबई महानगरपालिका व म्हाडा यांनीही दोन महिन्यांत गिरणी कामगारांसाठी जमीन व घरे उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत.