Thu, Jun 27, 2019 17:47होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महाराष्ट्रात धक्कादायक निकाल!

महाराष्ट्रात धक्कादायक निकाल!

Published On: May 24 2019 2:37AM | Last Updated: May 24 2019 2:33AM
मुंबई : विशेष प्रतिनिधी 

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातही भाजप-शिवसेना महायुतीने दणदणीत विजय मिळवित, 48 पैकी 41 जागांवर निर्णायक आघाडी घेतली आहे. भाजपने 23, तर शिवसेनेने 18 जागांवर आघाडी घेतली आहे. या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरते पानिपत झाले. आघाडी फक्त सहा जागा जिंकण्याची शक्यता आहे. 

गेल्यावेळी दोन जागा जिंकणार्‍या काँग्रेसला यावेळी फक्त एक जागा मिळू शकते. तर राष्ट्रवादीला पाच जागांवर समाधान मानावे लागेल. औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या इम्तियाज जलिल यांनी शिवसेनेचे दिग्गज खासदार चंद्रकांत खैरे यांना पराभवाचा धक्का देत खाते उघडले. 

चंद्रपूर मतदार संघातून सातत्याने लोकसभेवर जाणारे केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांना पराभव पत्करावा लागला. शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेले बाळू धानोरकर यांनी त्यांचा पराभव केला.