Wed, Jul 08, 2020 20:11होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महाड : गवत कापताना शॉक लागून दोघांचा मृत्यू

महाड : गवत कापताना शॉक लागून दोघांचा मृत्यू

Last Updated: Oct 16 2019 2:49PM

महाड औद्योगिक वसाहतीमधील वातावरण तणावपूर्ण आहेमहाड :  प्रतिनिधी 

महाड औद्योगिक वसाहतीमधील पंचतारांकित क्षेत्रामध्ये गुरांसाठी गवत कापण्याकरीता गेलेल्या वेरखोले गावातील दोघांचा बुधवारी (दि.१६) रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास विजेचा धक्‍का लागून मृत्यू झाला. या घटनेनंतर वेरखोले परिसरातील ग्रामस्थांनी वीज मंडळाच्या कार्यपद्धती विरोधात संतप्त भावना व्यक्त करून या मंडळाच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करेपर्यंत संबंधित मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतला. यामुळे महाड औद्योगिक वसाहतीमधील वातावरण तणावपूर्ण झाले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच आमदार भरतशेठ गोगावले यांनी घटनास्थळी धाव घेतली. संबंधित ग्रामस्थ तसेच स्थानिक पोलिस प्रशासनासोबत त्यांनी यासंदर्भात चर्चा सुरू केल्याची माहिती देण्यात आली आहे .

महादेव गणपत पवार (वय, ५५) आणि संकेत तांबे (वय २२ रा.वेरखोले) हे आपल्या नियमित गुरांसाठी गवत कापण्याच्या कामानिमित्ताने आमशेत सोलम कोंड शेत परिसरात गेले होते. दरम्यान सकाळी नऊ ते साडेनऊच्या सुमारास या परिसरात विजेच्या तारांचा धक्का लागून या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.  

या घटनेची माहिती मिळताच वेरखोले परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी शेकडोंच्या संख्येने धाव घेतली. तसेच या ठिकाणी आलेल्या पोलिस प्रशासन तसेच वीज मंडळाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांना घेराव घालून त्यांना या घटनेविरोधात संतप्त भावना व्यक्त केल्या. या ठिकाणी निर्माण झालेल्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून महाड औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्याकडून अतिरिक्त पोलिस बळ मागविण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून देण्यात आली. या ठिकाणीस्थानिक ग्रामस्थांच्या भावनांचा उद्रेक होऊ नये याकरिता स्थानिक प्रशासन कार्यरत असल्याचे दिसून आले.

मात्र वीज मंडळाच्या कारभाराविरोधात गेल्या अनेक महिन्यांपासून कार्यपद्धतीविरोधात स्थानिक ग्रामस्थांकडून संतप्त भावना व्यक्त होत आहेत. तसेच  वीज मंडळाच्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अन्यथा मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही असा पवित्रा संतप्त नागरिकांनी घेतला आहे. गेल्या काही महिन्यांपासून विद्युत वितरण कंपनीच्या कारभाराविरोधात तालुक्यातील विविध भागांमधून अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या परिसरातील वातावरण अत्यंत तणावपूर्ण असून वेरखोलेसह परिसरामध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.