Sun, Jul 21, 2019 07:52होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गड-किल्ल्यांच्या दुरुस्तीसाठी सरकारवर अवलंबून का राहायचे?

गड-किल्ल्यांच्या दुरुस्तीसाठी सरकारवर अवलंबून का राहायचे?

Published On: Jan 09 2018 2:02AM | Last Updated: Jan 09 2018 1:37AM

बुकमार्क करा
डोंबिवली : वार्ताहर

राज्यातील गड-किल्ल्यांची दुरवस्था झाली आहे. मात्र त्यासाठी सरकारवर अवलंबून राहायचे कशाला? तर स्थानिक नागरिक, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, बँका आणि कारखाने यांनी पुढाकार घेऊन गड-किल्ल्यांची स्वच्छता आणि दुरुस्ती करावी, असे आवाहन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी डोंबिवलीमध्ये एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी बोलताना केले. कल्याणचा दुर्गाडी किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आवडत्या किल्ल्यांपैकी एक आहे. त्याची देखभाल, दुरुस्ती केलीच पाहिजे. प्रेक्षणीय व ऐतिहासिक स्थळे चांगली ठेवावी, हे आपल्या मनात सुद्धा येत नाही. गड-किल्ल्यांच्या सौंदर्यावरील आपले प्रेम कमी झाले, अशीही खंत पुरंदरे यांनी व्यक्त केली. 

सध्या सुरू असलेल्या वादग्रस्त भिडे गुरूजींबाबत बोलण्यास त्यांनी यावेळी नकार दिला. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे कल्याण-शीळ मार्गावर असलेल्या कासारियो सिटीमधील रहिवासी आणि मराठी उद्योजक सुधीर गुप्ते यांच्या घरी आले होते. 

यावेळी मनसे नेते राजू पाटील यांनीही शिवशाहीर पुरंदरे यांची भेट घेतली. तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या डोंबिवली दिनदर्शिका 2018 चे प्रकाशन शिवशाहिरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मनसे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम, मनविसेचे शहराध्यक्ष सागर जेधे आणि मनसैनिक उपस्थित होते.