Thu, Nov 22, 2018 02:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › हिंदुत्ववादी भाजप राजकारणासाठी सेक्युलर होतोय

हिंदुत्ववादी भाजप राजकारणासाठी सेक्युलर होतोय

Published On: Jul 10 2018 1:03AM | Last Updated: Jul 10 2018 1:03AMमुंबई : प्रतिनिधी

ख्रिश्‍चन समाजाबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांना माझ्या वाणी स्वातंत्र्यावर अशी गदा येत असेल तर नको ते पद, अशी भूमिका  घ्यावी लागली. यावरून त्यांचा किती मानसिक छळ झाला असेल याची कल्पना येईल. शेट्टींच काय चुकल? हिंदुत्ववादी भाजप राजकारणासाठी सेक्युलर होत आहे, असा टोला भाजप नेतृत्वाला लगावत शिवसेनेने शेट्टी यांची पाठराखण केली आहे. 

भारतीय जनता पक्षाचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्या एका वक्तव्यावरून नव्या वादास तोंड फुटले आहे.  सहज केलेल्या विधानाबद्दल त्यांनी माफीही मागितली आहे (मागायला लावली). त्यामुळे या विषयास पूर्णविराम मिळायला हरकत नाही. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात हिंदू आणि मुस्लिम खांद्याला खांदा लावून लढले होते. मात्र इंग्रजांचे देशावर राज्य असल्याने ख्रिश्‍चनांचा या लढ्यात मोठ्या प्रमाणावर सहभाग नव्हता. या वक्तव्यामुळे ख्रिश्‍चन समाज जेवढा भडकला नसेल तेवढे आपले विविध राजकीय पक्षांचे झगेवाले भडकले आहेत; कारण इथे ख्रिस्ती बांधवांच्या प्रेम-आदराचा विषय नसून सरळसरळ मतपेटीचा विषय आहे; म्हणून  शेट्टी यांना गुन्हेगार ठरविले जात असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. 

ख्रिश्‍चन समाजासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून भाजपच्या दिल्लीतील सर्वोच्च हायकमांडने त्यांना झापले व माफी मागायला लावली. या दबावामुळे भावनाविवश शेट्टी खासदारकीचा राजीनामा द्यायला निघाले. यावरून त्यांचा किती मानसिक छळ झाला असेल याची कल्पना येईल. 

हिंदुत्ववादी भाजपफ राजकारणासाठी सेक्युलर होत आहे व सर्वच धर्माचे लोक त्यांना हवे आहेत. त्यामुळे अयोध्येत रामजी कायमचे वनवासात गेले तरी चालतील. पालघरची लोकसभा निवडणूक येनकेनप्रकारे जिंकावी यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी वसईतील चर्च व मिशनर्‍यांच्या पायर्‍या झिजवल्या, असा टोला शिवसेनेने लगावला आहे.