Sun, Aug 25, 2019 19:06होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भाजपविरोधी आघाडीत शिवसेना सहभागी होणार?

भाजपविरोधी आघाडीत शिवसेना सहभागी होणार?

Published On: May 24 2018 7:59AM | Last Updated: May 24 2018 7:59AMमुंबई : खास प्रतिनिधी

कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताना जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी भाजपविरोधात विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला आणि अनेक पक्षांच्या प्रमुखांना आमंत्रण दिले होते. महाराष्ट्रातून भाजपवर तुटून पडत असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही या सोहळ्याचे आमंत्रण होते, मात्र पालघरच्या प्रचारामुळे आपण येऊ शकत नाही, मात्र माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत, असे उद्धव यांनी कुमारस्वामी यांना फोन करून सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा या दोघांना शिवसेनेने गेल्या काही महिन्यांपासून लक्ष्य केले आहे. आगामी निवडणूक स्वबळावरच लढण्याचे उद्धव यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे देशभरातील भाजपविरोधी पक्ष सध्या शिवसेनेच्या संपर्कात आहेत. भाजपविरोधी आघाडी उभारण्याचा प्रयत्न काँग्रेसने सुरू केला असून त्यात उद्धव ठाकरे सामील होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.