Fri, Apr 26, 2019 15:21होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एका वर्षात शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल : आदित्य ठाकरे

एका वर्षात शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल : आदित्य ठाकरे

Published On: Dec 14 2017 9:29PM | Last Updated: Dec 14 2017 9:29PM

बुकमार्क करा

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

येत्या वर्षभरात शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल, असा इशारा शिवसेनेच्या युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिला आहे. अहमदनगर येथे एका रॅली दरम्यान त्यांनी हा इशारा दिला. त्याचबरोबर २०१९ची लोकसभा निवडणूक स्वतंत्र लढण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.  शिवसेना सत्ता सोडून आपल्या ताकतीवर सत्तेत येईल, असा विश्वासही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. एका बड्या इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. 

महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षांपासून युतीचे सरकार आहे. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून या युतीला ग्रहण लागले आहे. युतीतील नेत्यांमध्ये तसेच मंत्र्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असतात. त्यात आता आदित्य ठाकरे यांनीही उडी घेतली आहे. सरकारवर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले, 'हे सरकार आजपर्यंत शिक्षणाच्या मुद्दयावर काहीच करू शकलेले नाही. विद्यार्थाना त्यांच्या मागण्यांसंदर्भात भेटणार आहे. शिवसेना पक्ष हा विद्यार्थांचे प्रश्न सोडवण्यास कटिबद्ध असून, शिवसेनेने तयार केलेला शैक्षणिक उपक्रम विद्यार्थासाठी मार्गदर्शक ठरणारा आहे.'