Tue, Mar 19, 2019 05:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुलांनी काढली खड्याभोवती बसूनच खड्याची चित्रे

मुलांनी काढली खड्याभोवती बसूनच खड्याची चित्रे

Published On: Jul 14 2018 7:30PM | Last Updated: Jul 14 2018 7:33PMठाणे : प्रतिनिधी

सांताक्रूझ पश्चिम वॉर्ड क्रमांक 97 या ठिकाणी रस्त्याची मोठी दुर्दशा झाली आहे. यामुळे नागरिकांकडून मोठी नाराजी व्यक्त होत आहे. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधीचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने शिवसेनेने आज अनोखे आंदोलन केले. खड्याभोवती बसून "पारदर्शक पहारेकरी," या विषयावर विद्यार्थ्यानी खड्डयांचे चित्रं काढण्याची अनोखी स्पर्धाच शिवसेने घेतली. 

भारतीय जनता पार्टीचे आमदार आशिष शेलार आणि नगरसेविका हेतल गाला याच्या प्रभागात सांताक्रूझ पश्चिम वॉर्ड क्रमांक 97 हा भाग येतो. या ठिकाणच्या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडून रस्त्याची चाळण झाली आहे. यामुळे नागरिकांकडून मोठी नाराजी व्यक्त होत आहे. मात्र स्थानिक नागरिक शिवसेनेच्या नावाने ओरडा करत आहेत. यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दौलत नगर लिंक रोड, येथील साने गुरुजी शाळे समोर शालेय विद्यार्थांना सोबत घेत या खड्डयान भोवती  बसून "पारदर्शक पहारेकरी,"  या विषयावर खड्डयांचे चित्रं काढण्याची अनोखी स्पर्धाच घेतली. व विद्यार्थ्यानी काढलेली ही चित्रे आमदार व नगरसेवकांना पाठवले.

यावेळी शाखा प्रमुख सुनील मोरे,महिला उप विभाग संघटक उषाताई भोजने, वनिता पटेल यांच्यासह शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते.