Sat, Apr 20, 2019 10:17होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मनसेने वार्‍यावर सोडलेल्या कर्मचार्‍यांना शिवसेना देणार आधार!

मनसेने वाऱ्यावर सोडलेल्यांना शिवसेनेचा आधार!

Published On: Feb 23 2018 8:38AM | Last Updated: Feb 23 2018 9:25AMमुंबई : प्रतिनिधी

मुंबई महापालिकेतील मनसेचे अस्तित्व संपुष्टात आल्यामुळे महापालिका मुख्यालयातील पक्ष कार्यालयात काम करणार्‍या कर्मचार्‍यांची नोकरी धोक्यात आली आहे. पण या कर्मचार्‍यांसाठी शिवसेना धावून आली आहे. मनसेतून शिवसेनेत गेलेल्या त्या सहा नगरसेवकांनी या कर्मचार्‍यांना बेरोजगार होऊ देणार नसल्याची शपथ घेतली आहे.

वाचा : आरक्षणाचा विषय शरद पवार यांना आत्ताच का आठवला?: राणे

राजकीय पक्षांना त्यांच्या नगरसेवकांच्या संख्याबळानुसार पालिका मुख्यालयात कार्यालय देण्यात येते. या कार्यालयाला लागणारी विज व दुरध्गवनीचा खर्च पालिका उचलते. एवढेच नाही तर नगरसेवकांना पालिकेच्या वतीने लॉकर्स व अन्य सेवा-सुविधा पुरवण्यात येतात. सन 2012 मध्ये मनसेचे 28 नगरसेवक निवडून आल्यामुळे मुख्यालयात त्यांना अलिशान एसी कार्यालय मिळाले होते. सन 2017 मध्ये त्यांच्या नगरसेवकांची संख्या सातवर येऊनही त्यांना हेच कार्यालय देण्यात आले. नोव्हेंबरमध्ये मनसेचे सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे पालिकेतील मनसेचे अस्तित्वच संपुष्टात आले. मनसेकडे अवघा एक नगरसेवक शिल्लक राहिल्यामुळे त्यांना पालिकेने दिलेले पक्ष कार्यालय गमवावे लागणार आहे. त्यामुळे येथील कर्मचार्‍यांची नोकरीही धोक्यात आली आहे.

वाचा : अटके वेळी बाळासाहेबांबद्दलची आपुलकी कुठे होती : उद्धव ठाकरे

जानेवारीमध्ये मनसेने कर्मचार्‍यांना पगार देणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे मनसेची दहा वर्ष सेवा करणार्‍या कर्मचार्‍यांनी दुसर्‍या नोकरीचा शोध सुरूवात केला. अखेर मनसेतून शिवसेनेत गेलेल्या दिलीप लांडे यांनी कर्मचार्‍यांशी संपर्क साधून तुम्हाला बेरोजगार होऊ देणार नसल्याचे सांगितले. लांडे यांनी येथील कर्मचार्‍यांना स्वत:सह अन्य नगरसेवकांकडे नोकरीला ठेवण्याचे आश्‍वासनही दिले. एवढेच नाही तर मुंबई पालिकेच्या सेवेत कायमस्वरूपी घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही सांगितले. त्यामुळे बेरोजगाराची भीती असलेल्या या कर्मचार्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

वाचा : मुरबाडमधील आजीबाईच्या शाळेची लिम्का बुकात नोंद