Thu, Jun 20, 2019 00:32होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणे जिल्हा परिषदेत शिवसेनेची मुसंडी

ठाणे जिल्हा परिषदेत शिवसेनेची मुसंडी

Published On: Dec 14 2017 3:05PM | Last Updated: Dec 14 2017 3:05PM

बुकमार्क करा

ठाणे : पुढारी ऑनलाईन 

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत शिवसेनेने जोरदार मुसंडी मारली आहे. जिल्हा परिषदेत शिवसेनेने आतापर्यंत २५ जागांवर विजय मिळवला असून, सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांना केवळ आता दोन जागांची गरज आहे. आणखी काही जागांचे निकाल जाहीर होत असून, शिवसेना जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करणार असल्याचे निश्चित झाले आहे. 

शहापूर आणि अंबरनाथ पंचायत समितीमध्येही भाजपला फारशी चमक दाखवता आलेली नाही. शहापूर पंचायत समितीमध्ये शिवसेनेची सत्ता स्थापन झाली असून, तेथे २८ पैकी १२ जागा शिवसेनेला मिळाल्या आहेत. तर भाजपला सात आणि राष्ट्रवादीलाही सात जागा मिळाल्या आहेत. तेथे सर्वाधिक जागा मिळवून शिवसेना पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. अंबरनाथमध्येही तशीच परिस्थिती असून, तेथे सात जागा शिवसेनेला मिळाल्या आहेत. 

 


कल्याण तालुक्यातील सहा गटांच्या निवडणुकीचा निकाल असा
 

सेना-भाजप प्रत्येकी ३ - ३ जागांवर विजयी 


खडवली (सर्वसाधारण महिला )
शिवसेना विजयी -  सुषमा सागर लोणे (मते ५,२४९) 
भाजप पराभूत - विद्या अरुण पाटील (४,७८१)

घोटसई (नागरीकांचा मागासप्रवर्ग महिला )
भाजप विजयी  -  रेश्मा चिंतामण मगर (मते ६,२८६)
राष्ट्रवादी पराभूत - सरिता चंद्रकांत  गायकर (४,५५८)

मांजर्ली (नागरीकांचा मागासप्रवर्ग महिला ) 
शिवसेना विजयी - जयश्री अच्युत सासे (मते ५, ५०४)
 भाजप पराभूत - प्रीती मोहन राउत (४,२११)

कांबा (अनुसूचित जाती महिला ) 
भाजप विजयी - वैशाली अनिल शिंदे (मते ३, ५०३) 
शिवसेना पराभूत - वर्षा किरण जाधव (२,६१७)

म्हारळ (अनुसूचित जाती महिला)
भाजप विजयी - वृषाली विलास शेवाळे (मते २,४०५) 
शिवसेना पराभूत - मनिषा नरेश भोईर (२,०६९)

खोणी (सर्वसाधारण) 
शिवसेना विजयी - रमेश कृष्णा पाटील (३,८८८)
भाजप पराभूत - लक्ष्मण बाळकृष्ण पाटील (३,४२६)