Thu, Mar 21, 2019 15:25होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिवसेनेच्या महिलेकडून विभागप्रमुखाला कानशिलात

शिवसेनेच्या महिलेकडून विभागप्रमुखाला कानशिलात

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मानखुर्द : वार्ताहर

ईशान्य मुंबईमधील शिवसेनेची अंतर्गत गटबाजी आणि वाद  नेहमीच चव्हाट्यावर येत आहेत. कधी विभाग प्रमुखांच्या विरोधात पैसे घेऊन तिकीटवाटप केल्याचा आरोप, कधी पदवाटपात गटबाजी करून मनसैनिकांना पदे वाटप केल्याचे फ्लेक्स झळकावून रोष व्यक्त केला जात असतानाच गुरुवारी (दि.29)  मुंबई शिवसेनेचे विभाग प्रमुख राजेंद्र राऊत यांना भर कार्यक्रमात महिला शिवसैनिक पदाधिकार्‍याने थेट श्रीमुखात लगावल्याने पुन्हा येथील वाद समोर आला आहे. 

गोवंडीच्या शिवाजीनगर भागात गुरुवारी आयोजित एका कार्यक्रमात सेनेचे ईशान्य मुंबई विभाग प्रमुख राजेंद्र राऊत अतिथी म्हणून गेले असताना हा प्रकार घडला. सेनेच्या पदाधिकार्‍यांची नियुक्ती काही दिवसापूर्वी करण्यात आली. मात्र काही महिलांना या नियुक्त्या मान्य नव्हत्या. त्यातील सुचिता पावले या महिला शाखाप्रमुखाबाबत एका पदाधिकार्‍याने फोनवर चर्चा केली असता, या महिलेबाबत वाईट शब्द राऊत यांनी उच्चारल्याची एक क्लिप व्हायरल झाली होती. याची परिणीती म्हणून पावले आणि त्यांच्या इतर महिला कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमात उपस्थित राऊत यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. यानंतर झालेल्या शाब्दिक बाचाबाचीत पावले यांनी थेट राऊत यांच्या मुखात लगावली. त्यानंतर येथील वातावरण चिघळले.

यासंदर्भात रात्री उशिरापर्यंत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार नाट्य सुरू होते. मात्र दोन्ही बाजूने नमते घेतल्याने पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली नाही. या मारहाणीचे आणि फोनवरील संभाषणाची  क्लिप  व्हायरल झाल्याने शिवसेनेची मोठी नाचक्की झाली असून यावर आता  पक्षप्रमुख काय भूमिका घेतात, हे पाहणे गरजेचे आहे.

 

Tags : Mankhurd, Mankhurd news, Shivsena, Shivsena Women Officials, thick ear, 


  •