Fri, Jul 19, 2019 18:18होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कर्नाटकातही भाजपला शिवसेेनेचे आव्हान

कर्नाटकातही भाजपला शिवसेेनेचे आव्हान

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

उत्तर प्रदेश, गोवापाठोपाठ कर्नाटकातही शिवसेनेने भाजपला टक्‍कर देण्याचा निर्णय घेतला असून, विधानसभा निवडणुकीत सुमारे 60 जागा लढवणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.  सीमाभागात शिवसेना निवडणूक लढवणार नसून महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठिंबा देईल, अशी घोषणाही त्यांनी केली.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची घोषणा शिवसेनेने काही महिन्यांपूर्वी केली होती. देशातील अन्य राज्यांमध्येही शिवसेना स्वबळावरच लढेल, अशी घोषणा त्यावेळी करण्यात आली होती. बेळगावमधील सीमाभागात राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढणार नाही, या भागात इतर पक्षांनीही निवडणूक लढवू नयेत. जोपर्यंत या प्रश्‍नावर तोडगा निघत नाही, तोपर्यंत या भागाला केंद्रशासित प्रदेश जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी केली.

मुख्यमंत्र्यांना केले आवाहन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीचा प्रचार करावा, तरच ते खर्‍या अर्थाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठरतील, असे सांगत त्यांनी फडणवीस यांना आव्हान दिले. मुख्यमंत्र्यांनी सीमाभागात प्रचाराला जाऊ नये. हे नैतिकदृष्ट्या योग्य नाही, असेही त्यांनी सांगितले.

Tags : Karnataka, Election, BJP, Shivsena, Sanjay Raut 

 


  •