Thu, Feb 21, 2019 11:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भिवंडी : शहापुर शिवसेना तालुका उपप्रमुखाचा खून

भिवंडी : शहापुर शिवसेना तालुका उपप्रमुखाचा खून

Published On: Apr 20 2018 2:51PM | Last Updated: Apr 20 2018 2:51PMभिवंडी (ठाणे) : प्रतिनिधी 

भिवंडी तालुक्यातील दिघाशी जवळच्या देवचोळा येथे शहापुर शिवसेना तालुका उपप्रमुखाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. शैलेष निमसे असे शिवसेना तालुका उपप्रमुखाचे नाव आहे.

निमसे यांच्या हत्येनंतर ओळख पटू नये यासाठी मृतदेह पेटवून देण्यात आला होता. निमसे यांचा मृतदेह भिवंडी उपजिल्हा रुग्णालयातून शवविच्छेदनासाठी जे.जे. रुग्णालयाकडे रवाना करण्यात आला. 
 

Shivsena, Thane, District, Leader, Shailesh Nimse, Murder,