होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिवसेनेने आधी डिपॉझिट वाचवावे: आशिष शेलार 

शिवसेनेने आधी डिपॉझिट वाचवावे: आशिष शेलार 

Published On: Dec 08 2017 1:07PM | Last Updated: Dec 08 2017 1:07PM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी 

शिवसेनेने मोठ?या उत्साहात गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आपले उमेदवार उभे केले असले तरी शिवसेनेच्या उमेदवारांची अनामत रक्कम वाचविण्याची चिंता आदित्य ठाकरे यांनी प्रथम करावी, मग देश कसा चालला आहे यावर बोलावे असा टोला मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी लगावला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून केंद्रीय मंत्रिमंडळ, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री तसेच शेकडो खासदार सध्या गुजरातच्या निवडणूक प्रचारात गुंतले आहेत. पंतप्रधान मोदी यांनी देशाच्या विकासाचा ध्यास घेतला आहे. सर्वसामान्य जनता आज मोठ्या ताकदीनिशी त्यांच्यामागे उभी आहे. कोणी कितीही टीका केली तरी काही फरक पडणार नाही. देश कोण चालवतंय असा सवाल युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे