Fri, Nov 16, 2018 15:05



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पाकिस्तानचा झेंडा जाळल्याप्रकरणी शिवसेना पदाधिकार्‍यांना अटक

पाकिस्तानचा झेंडा जाळला; शिवसेना पदाधिकार्‍यांना अटक

Published On: Dec 30 2017 7:51AM | Last Updated: Dec 30 2017 7:51AM

बुकमार्क करा




बेलापूर ः वार्ताहर

पाकिस्तानी अतिरेक्यांनी अमरनाथ यात्रेकरुंवर केलेल्या भ्याड हल्याच्या निषेर्धात पाकिस्तानच्या झेंड्याची होळी करणार्‍या सात शिवसेना पदाधिकार्‍यांना शुक्रवारी वाशी पोलिसांनी अटक केली. पोलिसांच्या या कारवाईमुळे शिवसेनेत संतापाची लाट पसरली आहे. शिवसेना शहरप्रमुख विजय माने,उपशहर प्रमुख गणपत शेलार, संतोष मोरे, नवी मुंबई महिला शहर अध्यक्ष रंजना शिंत्रे, परिवहन समिती सदस्य समीर बागवान व माजी विरोधी पक्ष नेते दिलीप घोडेकर अशी अटक करण्यात आलेल्या शिवसेना पदाधिकार्‍यांची नावे आहेत.

जुलै 2017 मध्ये पाकिस्तानी अतिरेक्यांनी अमरनाथ यात्रेकरूंवर हल्ला केला होता. या हल्याच्या निषेर्धात भारतात खळबळ माजली होती. त्याचवेळी भारताच्या विविध भागात पाकिस्तानच्या या कृत्याचा निषेध करण्यात येत होता. त्याच पार्श्‍वभूमीवर नवी मुंबईतील शिवसेना नेत्यांनी 11 जुलै रोजी पाकिस्तानचा निषेध करत त्यांच्या झेंड्याची वाशीती शिवाजी चौकात होळी केली होती. त्यावेळी पाकिस्तान देशाचा झेंडा जाळल्या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात शिवसेना नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तब्बल 5 महिन्यानंतर या सर्व शिवसेना पदाधिकार्‍यांना शुक्रवारी अटक करण्यात आली. अटक करून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने सर्वांची जामिनावर मुक्तता केली आहे.