Tue, Nov 13, 2018 06:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिवसेना आमदारांची झाली गंमत

शिवसेना आमदारांची झाली गंमत

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी येणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची वाट पाहणाऱ्या शिवसेना आमदारांची आज चांगलीच गंमत झाली. विधानभवनाच्या गेटवर उद्धव ठाकरेंचे स्वागत करण्यासाठी थांबलेल्या शिवसेना आमदारांना अचानक नारायण राणे यांचे स्वागत करावे लागल्याने त्यांची तारांबळ उडाली.

विधानभवनात आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ५ वाजता बैठक होती. 

संबंधित : 

अडीच तास वेटिंग; वाघ-सिंह भेट रद्दच
ठाकरेंना वेटिंग करायला लागले चुकलेच : मुख्यमंत्री

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येणार म्हणून सगळे माध्यम प्रतिनिधी, कॅमेरामॅन, आणि सोबत शिवसेनेचे बहुतांश आमदार पायऱ्यांवर वाट बघत थांबले होते. त्यांच्यासोबत खास मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून भाजपचे आमदार प्रसाद लाडही पुष्पगुच्छ घेवून वाट पहात थांबले होते. 

अर्धा-पाऊण तास वाट पाहिल्यावर एक मर्सिडीज गाडी गेटवर आली. माध्यमांचे प्रतिनिधीही गेटकडे धावले. त्यामुळे सगळे फोटोग्राफर तिकडे पळाले. सोबतच शिवसेनेचे आमदारही तिकडे धावतात. प्रसाद लाडही धावतच गेटकडे गेले. माध्यमांचे कॅमेरे फोटो घेण्यासाठी सज्ज झाले. तोच गाडीचा दरवाजा उघडला आणि खाली उतरले नुकतेच खासदार झालले माजी मुख्यमंत्री नारायण राणे. 

वाचा : सरकारी खात्यातील ७२ हजार पदे भरणार : मुख्यमंत्री 

नारायण राणेंनाही कळेना नेमकं काय झालं ते. त्यातच फोटोग्राफर अन पत्रकार सगळे मोठ्यामोठ्याने हसायला लागले. सगळे का हसताहेत असा प्रश्न नारायण राणेंना पडला. प्रसाद लाड यांनी हसतच राणेंचे स्वागत केले तर शिवसेना आमदारांचे चेहरे मात्र बघण्यासारखे झाले.


  •