Thu, Jun 27, 2019 13:49होमपेज › Mumbai-Thane-Raigad › हिंदुत्वासाठी सोबत लढताना आमच्या पदरात धोंडे पडू नयेत!

हिंदुत्वासाठी सोबत लढताना आमच्या पदरात धोंडे पडू नयेत!

Published On: Apr 22 2018 8:08AM | Last Updated: Apr 22 2018 1:18AMमुंबई : प्रतिनिधी

हिंदुत्वचा मुद्यांवर 25 वर्षे आमची युती होती, पण तुम्हाला चांगले दिवस आले म्हणून एकाक्षणात युती तोडलीत. ज्यावेळी तुमच्यासोबत तुमच्या खांद्याला खाद्य लाऊन आम्ही लढत आहोत, त्यावेळी आमच्या पदरात धोंडे पडू नयेत एवढीच अपेक्षा आहे, असे खडेबोल भाजपाला सुनावतानाच चांगले दिवस आल्यावर तुम्हाला शिवसेना खटकते याचे दुःख होते, अशी खंत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी येथे व्यक्त केली. 

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या रोखठोक लेखणीतून साकारलेल्या गोफ या पुस्तकाच्या दोन खंडाचे प्रकाशन सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते झाले. शिवाजी मंदिर येथे झालेल्या या कार्यक्रमात ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर त्यांचा नामोल्लेख टाळून अत्यंत बोचरी टीला केली. 

गोफ या पुस्तकातील लिखाणासंदर्भात बोलताना सुनिल देवधर यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावर शिवसेनेचा पहिला आमदार निवडून आला होता. त्याचे श्रेय बाळासाहेब व शिवसेनेला द्यावे लागेल असे सांगितले. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात हाच संदर्भ देत 1987 साली हिंदुत्वाच्या मुद्यावर देखील निवडणुका जिंकता येतात हे पार्ल्यातील पोटनिवडणुकीतून सिद्ध झाले, अतिरेक्यांच्या विरोधात कुणी बोलायला तयार नसताना बाळासाहेबांनी आवाज उठवला आणि हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजपशी एकत्र येऊन निवडणुका लढविल्या. पण पुढे चांगले दिवस आल्यावर त्याचा विसर पडून मेहबुबा मुफ्ती यांच्यासारखी लोक तुम्हाला जवळची वाटतात अशी खंत त्यांनी व्यक्त केली. 

उत्तरप्रदेश, बिहार व अन्य राज्यातील भाजपा खासदार शिवसेनेच्या संजय राऊत यांना दिल्लीत घाबरून असतात, नेमकं काय ते माहीत नाही, असे केतकर यांनी आपल्या भाषणात सांगत मोदी सरकारच्या राजनीतीवर जोरदार टिका केली. त्यावर देवधर यांनी भाजपा खासदार राऊत यांना घाबरत नाही तर त्यांचा आदर करतात असा टोला लगावला. 

जगभरातील व्यक्तिमत्त्वे उलगडणारा गोफ

गोफ या चारशे पानी द्विखंडीय पुस्तकात संजय राऊत यांनी हिंदुस्थानसह जगभरातील विविध व्यक्तिमत्त्वे आपल्या लेखणीतून उलगडली आहेत. महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, डॉ. एपीजे अब्दुल कलाम, इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण, चिंतामणराव देशमुख, नरसिंह राव, शरद पवार, सोनिया गांधी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, नरेंद्र मोदी, विलासराव देशमुख, श्रीनिवास पाटील, पृथ्वीराज चव्हाण, आर. आर. पाटील, जांबुवंतराव धोटे, जयललिता, राहुल गांधी यांच्यावरील लेख या पुस्तकात आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन, आधुनिक सिंगापूरचे जनक ली कुआन, इराकचे राष्ट्राध्यक्ष सद्दाम हुसैन, खलिल जिब्रान, क्युबाचे फिडेल कॅस्ट्रो अशा जागतिक व्यक्तिमत्त्वांवरील लेखनही या पुस्तकात आहे.

Tags : Mumbai, Shiv Sena party chief, Uddhav Thakre, expressed, Mumbai news,