Sun, Apr 21, 2019 00:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईचे डबेवाले आता ई-सायकलवर

मुंबईचे डबेवाले आता ई-सायकलवर

Published On: Apr 17 2018 2:26AM | Last Updated: Apr 17 2018 1:34AMमुंबई : प्रतिनिधी

प्रदूषणमुक्त मुंबईसाठी शिवसेनेने पुढाकार घेतला असून त्याचाच एक भाग म्हणून शिवसेना दक्षिण मुंबई विभाग क्रमांक 12 यांच्या वतीने 25 डबेवाल्यांना सोमवारी ई-सायकली भेट देण्यात आल्या. यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, मुंबईचे महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर, पर्यावरण मंत्री रामदास कदम, परिवहन मंत्री दिवाकर रावते,आरोग्यमंत्री डॉ. दिपक सावंत, खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, हेमंत खोडसे, विभागप्रमुख पांडूरंग सकपाळ, सुरेखा परब आदी मान्यवर उपस्थित होते.

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि विभागप्रमुख पांडूरंग सकपाळ यांच्या प्रयत्नाने बॅटरीवर चालणार्‍या ई सायकलीचे वाटप सोमवारी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. 130 वर्षाची परंपरा असलेल्या डबेवाल्यांसाठी शिवसेना मुंबईत डबेवाला भवन उभारणार असून प्रदूषण कमी करण्यासाठी ई-सायकल प्रमाणे बेस्ट मुंबईत आणखी 80 ई-बस आणणार आहे, असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले. 

अनेक वर्षांपासून मुंबईचे डबेवाले न थकता सायकलवरुन डबे पोहोचवण्याचे काम करत आहेत. मात्र आधुनिकतेची कास धरताना त्यांनी स्वखर्चाने मोपेड स्कूटर घेण्याचा प्रयत्न केला. परंतु पेट्रोलचे सातत्याने वाढणार्‍या किमतींमुळे त्यांनी आपली सायकलच बरी म्हणत पुन्हा सायकलवर डबे पोहोचवण्यास सुरुवात केली. नाशिकच्या निबे मोटर्सची ई -सायकल बाजारात उपलब्ध झाल्याने त्यांनी या सायकलला पसंती दिली. 

Tags : Mumbai, Shiv Sena, gift, e-bicycle, Mumbais Dabewala, Mumbai news,