Mon, Nov 19, 2018 06:20होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘... तर आपला मुख्यमंत्री करण्याचे स्वप्न निश्चित पूर्ण’

‘... तर आपला मुख्यमंत्री करण्याचे स्वप्न निश्चित पूर्ण’

Published On: Jul 03 2018 2:25AM | Last Updated: Jul 03 2018 8:14AMमुंबई : प्रतिनिधी

जय पराजय हा होतच असतो. निवडणुकीत आपल कस होणार? पराजय होईल म्हणून लढायचेच नाही, असे म्हणण्याचे दिवस आता गेलेत. येथून पुढे फक्त लढायचे आणि जिंकायचेच. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात आपण लढलो आणि जिंकलो सुद्धा. शिवसैनिक असेच लढले तर आपला मुख्यमंत्री करण्याचे स्वप्न निश्चित पूर्ण होईल असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

विधानपरिषदेच्या मुंबई पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंत शिवसेनेचे उमेदवार निवडून आल्याबद्दल रंगशारदा सभागृहात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेकडून विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नवनिर्वाचित आमदार विलास पोतनीस, किशोर दराडे, खा.संजय राऊत, राज्यमंत्री रविंद्र वायकर, आ.अनिल परब आदी यावेळी उपस्थित होते.

निवडणुकीत लढलो नाही तर आपल्याला आपल्या ताकदीचा अंदाज येत नाही. मुंबई पदवीधर मतदारसंघ आपलाच आहे. कालही होता, आजही आहे आणि येथून पुढे आपल्याकडेच राहणार. पण इतर मतदारसंघात जेथे आपण कधी निवडणूक लढविली नव्हती तिथेही यावेळी उमेदवार दिला. मुंबई शिक्षक मतदारसंघात आपण दुसर्‍या क्रमांकावर आलो. हे यश शिवसैनिकांचे आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. कोकण पदवीधर आपण पहिल्यांदाच लढलो, निवडून येऊ असे वातावरण होते, पण थोड्या मताने आपला पराभव झाला. नशिक शिक्षक मतदासंघाची निवडणूक देखील शिवसेनेने पहिल्यांदा लढवली. नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे आमदार नरेंद्र दराडे माझ्याकडे आले आणि त्यांनी आपण आदेश दिला तर माझा भाऊ लढेल असे सांगितले. त्यानुसार किशोर दराडे यांना उमेदवारी देण्यात आली. ते या निवडणुकीत शिवसेनेकडून लढले आणि जिंकले सुद्धा.