Mon, Jan 21, 2019 19:45होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अटके वेळी बाळासाहेबांबद्दलची आपुलकी कुठे होती : उद्धव ठाकरे

अटके वेळी बाळासाहेबांबद्दलची आपुलकी कुठे होती : उद्धव ठाकरे

Published On: Feb 23 2018 1:42AM | Last Updated: Feb 23 2018 1:42AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

राज्यात काँग्रेस आघाडी सरकार असताना 2009 मध्ये तत्कालीन गृहमंंत्री छगन भुजबळ यांच्या आदेशावरून 1993 च्या मुंबईतील दंगलीबाबत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक करण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी शरद पवारांची बाळासाहेबांबद्दलची आपुलकी कुठे गेली होती, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बुधवारी पुण्यात मुलाखत घेतली होती.

या मुलाखतीमध्ये पवारांनी बाळासाहेबांबद्दलच्या अनेक आठवणी सांगितल्या. इतकेच नाही तर नेता म्हणूनही बाळासाहेब आणि त्यांचे कुटुंबीय आपल्याला आवडतात, असे उत्तर पवार यांनी एका प्रश्‍नाला दिले होते. आज मुंबईत एका कार्यक्रमात उद्धव यांना आपण ही मुलाखत पाहिली का, असे प्रसारमाध्यमांनी विचारले. त्यावर चोरूनसुद्धा ही मुलाखत पाहिली नसल्याचे सांगणार्‍या उद्धव यांनी पवारांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्याचा प्रयत्न  केला.