Thu, Aug 22, 2019 04:17होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सायन पोटनिवडणुकीत सामना सेना विरूध्द सेना

सायन पोटनिवडणुकीत सामना सेना विरूध्द सेना

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी 

पालिकेच्या सायन प्रभाग क्रमांक 173 मध्ये पोटनिवडणुकीत काँग्रेसने शिवसेनेच्या नाराज कार्यकर्त्याला उमेदवारी देऊन शिवसेनेच्या बालेकिल्ल्यास आव्हान दिले आहे. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेना विरूध्द शिवसेना असा सामना रंगणार आहे. ही निवडणूक जिंकणे शिवसेनेसाठी प्रतिष्ठेचे असल्यामुळे सेनेच्या नेत्यांना प्रचारात उतरण्याचे आदेश थेट मातोश्रीतून देण्यात आले आहेत.

सायन प्रभाग क्रमांक 173 मधील शिवसेना नगरसेवक प्रल्हाद ठोंबरे यांचे निधन झाल्यामुळे या प्रभागात शुक्रवार 6 एप्रिलला पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी मंगळवारी शिवसेनेच्या वतीने रामदास कांबळे व संदीप कांबळे या दोन भावांचे उमेदवारी अर्ज भरण्यात आले.  तर, शिवसेनेच्या विरोधात दिवंगत नगरसेवक यांचे भाऊ बापू ठोंबरे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. त्यामुळे शिवसेनेची मते फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण शिवसेनेने ठोंबरे यांची समजूत काढून त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडले. ठोंबरेंनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असला तरी, ठोंबरे यांना मानणारे शिवसैनिक कमालीचे नाराज झाले आहेत. त्यात काँग्रेसने कट्टर शिवसैनिक असलेल्या सुनील शेट्ये यांना उमेदवारी देऊन, शिवसेनेची ताकद कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. शेट्ये यांना काँग्रेसमध्ये आणण्यासाठी विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली होती. एवढेच नाही तर या निवडणुकीत शेट्ये यांना निवडून आणण्यासाठी राजा यांच्यासह माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 

Tags : mumbai, mumbai news, Shiv Sena against Shiv Sena, Sion by-election,


  •