Sun, Aug 18, 2019 15:15होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'रात गयी बात गयी'; शिवसेना स्‍वतंत्रच लढणार

'रात गयी बात गयी'; शिवसेना स्‍वतंत्रच लढणार

Published On: Jun 07 2018 11:20AM | Last Updated: Jun 07 2018 11:20AMमुंबई : पुढारी ऑनलाईन

भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. झाले गेले विसरून शिवसेना आणि भाजप पुन्‍हा लोकसभा एकत्र लढण्याच्या निर्णयावर शिक्‍कामोर्तब झाले. परंतु, या युतीच्या पुनर्बांधणीचा पुरता आनंद भाजप नेत्यांनी साजरा करण्याच्या आतच शिवसेनेने घुमजाव केले आहे. शहांनी मनधरणी करण्याचा प्रयत्‍न केला असला तरी शिवसेना स्‍वतंत्र लढण्यावर ठाम असल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे. त्यामुळे रात गयी बात गयी अशी भूमिका शिवसेनेने घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

►'जातीय तेढ वाढविण्यासाठी काँग्रेसने एजन्सी नेमली'

शिवसेना प्रक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या भेटीच्या पार्श्‍वभूमीवर संजय राऊत यांनी गुरुवारी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली.  राऊत म्‍हणाले की, शिवसेनेच्या कार्यकारिणीने अगोदरच स्‍वतंत्र निवडणूक लढविणार असल्याचे सर्वसहमतीने जाहीर केले आहे. त्यामुळे येणार्‍या निवडणुका आम्‍ही स्‍वतंत्रपणेच लढणार आहोत. उद्धव ठाकरे आणि शहा यांच्यात दोन तास विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यांच्यासोबत पुन्हा भेट देखील ठरली आहे. परंतु यामुळे शिवसेना आपला निर्णय बदलणार नाही. अजूनही आम्‍ही स्‍वतंत्र लढण्यावर ठाम आहोत, असे राऊत म्‍हणाले. 

►लोकसभेसाठी भाजप-सेना एकत्रच!

संजय राऊत यांची युतीबाबतची भूमिका विरोधाचीच राहिली आहे. त्यामुळे अमित शहा यांच्या मातोश्री भेटीवेळी त्या ठिकाणी राऊत उपस्‍थित नव्‍हते. त्यातच आजच्या विधानाने पुन्‍हा एकदा युतीबाबत उत्‍सुकता निर्माण झाली आहे.