Mon, Aug 19, 2019 00:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिवसेनेची कार्यकारिणी जाहीर, आदित्य ठाकरेंना नेतेपदी बढती

शिवसेनेची कार्यकारिणी जाहीर, आदित्य ठाकरेंना नेतेपदी बढती

Published On: Jan 23 2018 11:53AM | Last Updated: Jan 23 2018 1:20PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना नेतेपदी बढती देण्यात आली आहे. आदित्य ठाकरे यांच्या नेते पदासाठीचा ठराव रामदास कदम यांनी मांडला त्याला गजानन कीर्तिकर यांनी अनुमोदन दिले.  त्याचबरोबर मनोहर जोशी आणि सुधीर जोशी यांचे नेतेपदही कायम ठेवण्यात आले आहे. 

सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, वरळी येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय झाल्याचे राज्यमंत्री  गुलाबराव पाटील यांनी सांगितले. दरम्यान, एकनाथ शिंदे यांना यंदा नेतेपद देण्यात आलेले नाही. 

बैठकीस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, मनोहर जोशी, सुभाष देसाई, सुधीर जोशी यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील शिवसेनेचे मंत्री, आमदार उपस्थित आहेत.

अशी आहे शिवसेनेचे नवी कार्यकारिणी

नेतेपद- आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, चंद्रकांत खैरे, आनंदराव आडसूळ, अनंत गीते
सचिवपद- मिलिंद नार्वेकर 
प्रवक्ते- अरविंद सावंत, नीलम गोऱहे, मनिषा कायंदे, अमोल कोल्हे, अनिल परब

कार्यकारिणीच्या बैठकीतील ठराव 

> 2019च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढणार 

> शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार आणि त्याला संपूर्ण कर्जमुक्त करणार 

> स्वामीनाथन समितीच्या शिफारसी मंजूर करण्याचा ठराव

अपडेट-

> शिवसेना प्रमुखांनी संघटना तयार केली नाही तर विचार दिला- उद्धव ठाकरे
> शिवसैनिक हा हात वर करणारा नव्हे तर मुठ आवळणारा- उद्धव ठाकरे
> आज सरदार पटेल असते तर काश्मीर प्रश्न शिल्लक नसता- उद्धव ठाकरे
> ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळे करून सत्तेत येता, भाजपबद्दल जनतेचे मत- उद्धव ठाकरे
> निवडणुका आल्या की पाकिस्तानची आठवण येते- उद्धव ठाकरे 
> गडकरींनी नौदलाची नालस्ती केली- उद्धव ठाकरे 
> नौदलात जे शौर्य आहे, ते तुमच्या 56 इंच छातीत नाही- उद्धव ठाकरे
> यापुढे प्रत्येक राज्यात शिवसेना निवडणूक लढवणार-  उद्धव ठाकरे यांची घोषणा 

> आतापर्यंत हिंदू मतांमध्ये फूट नको म्हणून अन्य राज्यात निवडणूक लढवली नाही- उद्धव ठाकरे
> हिंदुत्वाच्या मुद्दयावर यापुढे निवडणूक लढवणार- उद्धव ठाकरे 
> मोदी म्हणजे बोलाची कढी आणि बोलाचा भात- उद्धव ठाकरे 
> अहमदाबादऐवजी लाल चौकात जाऊन तिरंगा फडकवा- उद्धव ठाकरे
> सर्जिकल स्ट्राईकचे श्रेय घेण्याचा प्रयत्न 
> गोहत्या बंदीसारखीच थापाबंदी करा- उद्धव ठाकरे
> कोरेगाव-भीमा हिंसाचार विषण्ण करणारी घटना- उद्धव ठाकरे

संबंधित बातम्या: 

शिवसेनेचा थेट भाजपाशी पंगा; नेमणार ग्रामीण नेते

बाळासाहेब एक रोखठोक व्यक्तीमत्व