Wed, Jun 26, 2019 11:25होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भिडे गुरुजींवरील खोटे आरोप मागे घ्या, आझाद मैदानावर एल्गार

भिडे गुरुजींवरील खोटे आरोप मागे घ्या, आझाद मैदानावर एल्गार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : पुढारी ऑनलाईन

संभाजी भिडे यांच्या सन्मानार्थ ठाणे आणि मुंबईतील कार्यकर्ते आझाद मैदानावर एकत्रित आले आहेत. संभाजी भिडे गुरुजींवरील सर्व खोटे आरोप मागे घ्यावेत, मिलिंद एकबोटे यांची सन्मानपुर्वक सुटका करावी, धनजंय देसाई यांची खोट्या गुन्हातून मुक्तता करावी, १ जानेवारी दंगलीतील मृत पावलेला मराठा तरूण राहुल फटांगणेच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करावी, अशा विविध मागण्यासाठी मुंबई आणि ठाण्यातील भिडे समर्थकांनी मुंबईतील आझाद मैदानावर सन्मान मोर्चा काढला आहे. 

हातात लाल रंगाचे झेंडे घेवून भिडे समर्थकांची मोर्चामध्ये मोठ्या उपस्थिती दर्शविली आहे. जय भवानी, जय शिवाजी, जय श्रीराम, भिडे गुरुजी आंगार है, बाकी सब भंगार है! अशा घोषणा देत आंदोलकांचा एक एक गट सीएसटीहून आझाद मैदानाकडे कूच करत आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Tags : Shiv Pratishthan Hindustan, Shiv Pratishthan Hindustan Rally, Sambhaji Bhide,, Azad Maida Mumbai 


  •