Wed, May 22, 2019 15:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › म्युनिसिपल मजदूर युनियनमधून शशांक राव यांची हकालपट्टी!

म्युनिसिपल मजदूर युनियनमधून शशांक राव यांची हकालपट्टी!

Published On: Dec 03 2017 1:06AM | Last Updated: Dec 03 2017 12:30AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी 

म्युनिसिपल मजदूर युनियनच नाही तर, रिक्षा-टॅक्सी, फेरीवाला व अन्य कामगार क्षेत्रात स्वत:चे वलय निर्माण करणार्‍या कामगार नेते स्व. शरद राव यांचे चिरंजीव शशांक राव यांची युनियनमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. युनियनच्या नव्या कार्यकारिणीत राव समर्थकांचा पत्ता कापण्यात आल्यामुळे कामगार क्षेत्रात नाराजीचा सूर उमटत आहे. 

शशांक राव यांच्याकडे युनियनची जबाबदारी सोपवली जाईल, असे वाटत होते. पण गेल्या काही दिवसापासून शशांक राव व राव यांचे खास समर्थक रमाकांत बने यांना दूर ठेवले जात होते. त्यामुळे शशांक राव व बने यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचा सूर उमटत होता. आठ दिवसांपूर्वी झालेल्या युनियनच्या महासभेत बने यांच्या समर्थकांनी गोंधळ घातला. बने यांना शशांक यांचा पाठिंबा असल्याचे काही कामगार नेत्यांना वाटत होते. त्यामुळे या दोघांचाही पत्ता कापण्याचा निर्णय शरद रावांसोबत खांद्याला खांदा लावून काम करणार्‍या ज्येष्ठ नेत्यांनी घेतला. 

म्युनिसिपल मजदूर युनियनची नवी कार्यकारिणी जाहीर करून शशांक व बने यांचा पत्ता कापण्यात आला. बने यांना सरचिटणीस पद हवे होते. पण ते देण्यास युनियनचे ज्येष्ठ नगरसेवक तयार नसल्याचे समजते. दरम्यान रमाकांत बने, शशांक राव व रंगनाथ सातवसे यांना युनियनमधून काढून टाकल्याचे म्युनिसिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष सुखदेव काशिद यांनी सांगितले. कार्यकारिणीने थेट शरद राव यांच्यावर आरोप केल्याने आपण युनियनमधून बाहेर पडल्याचे रमाकांत बने यांनी स्पष्ट केले.