Fri, Apr 26, 2019 01:23होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शेअर बाजारात घसरणीचे सत्र सुरूच  

शेअर बाजारात घसरणीचे सत्र सुरूच  

Published On: Feb 05 2018 9:40AM | Last Updated: Feb 05 2018 10:08AMमुंबई : पुढारी ऑनलाईन

जागतिक आणि आशियाई बाजारपेठेतील मंदीचा परिणाम सोमवारी भारतातील शेअर बाजारावर झाला. दिवस अखेर मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 309.59 अंकांनी घसरण होत ३४ हजार ७५७ अंकावर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांकात 94.05 अंकांची घसरण होत तो १० हजार ६६६ अंकावर बंद झाला. बाजारात सलग पाचव्या सत्रात घसरण सुरुच राहीली.  

फेडरल रिझर्व्ह बँक आणि अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने अपेक्षेपेक्षा जास्त व्याजदर वाढवल्याने डाऊ जोन्समध्येही ६६६ अंकांची घसरण झाली होती. गेल्या २० महिन्यांमधील २००८ नंतर ही सर्वात मोठी घसरण होती. 

गेल्या आठवड्यात शुक्रवारी मुंबई शेअर बाजारात ८३९.९१ अंकांची घसरण झाली होती. निर्देशांकाने २६ डिसेंबर रोजी पहिल्यांदा ३४ हजार अंकांचा टप्पा पार केला होता. त्यांनतर १७ जानेवारीला ३५ हजारांवर पोहचला होता.

सेन्सेक्स आणि निफ्टी शुक्रवारी दोन टक्क्यांनी घसरला होते. बजेटमध्ये शेअर विक्रीवरील नफ्यावर दीर्घकालीन भांडवली कर लावण्याची घोषणा करण्यात आल्यानंतर  बाजारात घसरण झाली होती. ही घसरण आजही कायम राहीली.