Fri, Apr 19, 2019 12:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विरोधी पक्षांनी एकत्र यावे; शरद यादव यांचे आवाहन

विरोधी पक्षांनी एकत्र यावे; शरद यादव यांचे आवाहन

Published On: Jan 29 2018 1:30AM | Last Updated: Jan 29 2018 12:59AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

सध्या देशात अघोषित आणीबाणी असून संविधान धोक्यात आहे. या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे, असे आवाहन ज्येष्ठ समाजवादी नेते शरद यादव यांनी केले.

समाजवादी आणि जनता परिवारातील संघटनांच्या कार्यकर्त्यांबरोबर ताडदेवच्या जनता केंद्रात झालेल्या बैठकीत हे आवाहन केले. यादव म्हणाले, सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांची हे सरकार सोडवणुक करत नाही. त्यामुळे अशा राज्यकर्त्याना सत्तेवर खाली खेचणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र आले पाहिजे. अन्यथा 2019 ची लोकसभेची निवडणूक देशातील शेवटची निवडणूक ठरेल. त्यानंतर निवडणुका होतील की नाही हे कुणी सांगू शकत नाही.

जनता दल (धर्मनिरपेक्ष), राष्ट्र सेवा दल, अपना परिवार, शिक्षक भारती, छात्रभारती या प्रमुख संस्था, संघटनांचे प्रमुख कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते. यावेळी मुंबईत 4 जानेवारीला राष्ट्रीय छात्र संमेलनावर सरकारने केलेल्या दडपशाही विरोधात लढलेल्या छात्रभारतीच्या लढाऊ कार्यकर्त्यांचा शरद यादव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.