Wed, Nov 14, 2018 02:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › संविधान बचाव रॅलीने पवार - विखेंचा दुरावा दूर 

अनेक वर्षांनी पवारांनी विखेंच्या घरची पायरी चढली

Published On: Jan 26 2018 1:41PM | Last Updated: Jan 26 2018 1:41PMमुंबई : प्रतिनिधी

संविधान बचाव रॅलीसाठी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा बंगला केंद्रबिंदू ठरला आहे. विरोधी पक्षातील प्रमुख नेते जमले असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही बंगल्यावर आले आणि विखे-पाटलांना सुखद धक्का बसला. 

गेली काही वर्ष पवार आणि विखे - पाटील घराण्यात संघर्ष सुरू आहे. सत्तेत असताना अजित पवार यांनी विखे पाटील यांच्या ताब्यातील अहमदनगर जिल्ह्यातील मुळा प्रवरा सहकारी वीज कंपनी बरखास्त केली होती. तेव्हापासून हे वैर अधिकच वाढले होते. मात्र आज शरद पवार विखेंच्या बंगल्यावर अल्याने ही कटुता काहीशी कमी झाल्याची चर्चा रंगली. अनेक वर्षांनी शरद पवार हे विखेंच्या घरची पायरी चढले आहेत.