राजकीय घडामोडींना वेग; संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला

Last Updated: Nov 08 2019 4:19PM
Responsive image


पुढारी ऑनलाईन डेस्क 

आज (दि.8) महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. मुंबईतील मातोश्री, वर्षा बंगला आणि सिल्व्हर ओक या बंगल्यांवर नेत्यांच्या भेटींचा सपााटाच लागला आहे दरम्यान संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे प्रमूख शरद पवार यांची दोन दिवसांत दुसऱ्यांदा भेट घेतली आहे. आजही त्यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय घडामोडींना वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. ही भेट दाबाव तंत्र होता की, सत्ता स्थापनेची खलबते करण्यासाठी होती अशी चर्चा सुरु आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा कार्यकाळ संपण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. या सगळ्या घडामोडीत आज सायंकाळी 4.30 वाजता फडणवीस पत्रकार परिषद घेणार आहेत. महायुतीला अपेक्षीत यश मिळाले असेल तरी शिवसेनेने मुख्यमंत्री पदासह सत्तेत निम्मा वाटा मागितल्याने मागच्या १५ दिवसात भाजपला सत्ता स्थापन करता आली नाही. आज (ता.०८) सत्ता स्थापनेचा शेवटचा  दिवस असल्याने कोण सत्ता स्थापन करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.  

भाजपला स्वबळावर सत्ता स्थापन करण्यासाठी मॅजीक फिगर गाठता आली नसल्याने सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेचे पाठबळ घ्यावे लागणार आहे. परंतु महायुती करते वेळी जे ठरले आहे त्याप्रमाने मिळावे या भूमिकेवर  शिवसेना ठाम आहे. याउलट भाजपही मुख्यमंत्रीपद सोडणार नसल्याच्या भूमिकेवर ठाम आहे.