Mon, Dec 17, 2018 00:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शरद पवार, राजू शेट्टी यांच्यात दिलजमाई

शरद पवार, राजू शेट्टी यांच्यात दिलजमाई

Published On: Jan 28 2018 1:33AM | Last Updated: Jan 28 2018 12:31AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

भाजपच्या गोटातून बाहेर पडलेल्या खा. राजू शेट्टी यांनी राज्यात भाजपविरोधात वातावरण तापविण्यास सुरूवात केली असून संविधान बचाव रॅलीच्या माध्यमातून राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशीही दिलजमाई करीत आपला संघर्ष संपुष्टात आणल्याचे स्पष्ट झाले.

खा. शेट्टी यांनी ऊस उत्पादक पट्ट्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना बांधताना साखर कारखानदारांवर नेहमीच हल्लाबोल केला. कारखानदारांचे नेते म्हणून शरद पवार यांना नेहमीच टार्गेट केले. थेट बारामतीत जावून शेट्टींनी आव्हान दिले. त्या जोरावरच त्यांनी कॉग्रेस, राष्ट्रवादीचे आव्हान मोडीत काढत आधी विधानसभा आणि नंतर लोकसभेत प्रवेश केला. मात्र राजकीय परिस्थिती बदलल्याने राजू शेट्टी यांच्या राजकारणाचाही नवा अध्याय सुरू झाला आहे. 

26 जानेवारीला संविधान बचाव रॅलीत शरद पवार आणि शेट्टी एकत्र आले. शरद पवार, अजित पवार यांच्या खांद्याला खांदा लावून शेट्टी चालत होते. राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना भाजपने फोडल्यानंतर शेट्टी भाजपपासून दुरावले. तेव्हापासून त्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.