होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या प्रवक्तेपदी शरद गोरे यांची निवड 

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या प्रवक्तेपदी शरद गोरे यांची निवड 

Last Updated: Jan 29 2020 6:47PM

संग्रहित छायाचित्रमुंबई : पुढारी ऑनलाईन

अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या प्रवक्तेपदी सुप्रसिद्ध  निर्माते, लेखक, दिग्दर्शक शरद गोरे यांची निवड करण्यात आली. महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्या हस्ते गोरे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. चित्रपट महामंडळाच्या इतिहासात पहिले प्रवक्ते पद भूषिवण्याचा मान शरद गोरे यांना मिळाला आहे. यावेळी महामंडळाचे कोषाध्यक्ष संजय ठुबे, मार्गदर्शक अनिल गुंजाळ अभिनेते राहुल बळवंत, प्रकाश धिंडले आदी मान्यवर उपस्थित होते.

अधिक वाचा : 'माझी बदनामी करण्यासाठी रचलाय कट', गणेश आचार्यने सोडले मौन

गोरे यांनी प्रेमरंग या चित्रपटात निर्मिती, दिग्दर्शन, लेखन, अभिनय, गीत, संगीत, अभिनय अशी चौफेर कामगिरी केली आहे. याशिवाय रणांगण, उष:काल, फाटक, ऐैतवी या चित्रपटासह सत्यांकुर, अन्नदान की पिंडदान, महापूजेची उत्तरपूजा, पंखातलं आकाश या लघुपटांचे दिग्दर्शन केले आहे. शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या नाटकासह अनेक चित्रपट, लघुपटांसाठी गीत, संगीत, दिग्दर्शन त्यांनी केले आहे. 

पंखातलं आकाश या त्यांच्या पहिल्याच लघुपटाचे खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कौतुक केले. उषा मंगेशकर, रवींद्र साठे,आनंद शिंदे उत्तरा केळकर अशा  अनेक दिग्गजांनी त्यांच्या संगीत असलेल्या गाण्यांना स्वरसाज चढविला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद या संस्थेचे संस्थापक व  राष्ट्रीय कार्याध्यक्ष गोरे गेली पंचवीस वर्षे कार्यरत आहेत. युगंधर प्रकाशन या त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून आजवर 120पुस्तके त्यांनी प्रकाशित केली आहेत. 

अधिक वाचा : लता मंगेशकर यांच्या कुशीत कोण आहे 'हे' बाळ?

तसेच विविध साहित्य संमेलनांचे संमेलन अध्यक्ष हि त्यांनी भूषिवले आहे.  प्रिय प्रिये, प्रेम हे काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. शेतकरी आत्महत्या की हत्या या चिंतनशील ग्रंथाचे लेखन केले त्यांनी केले आहे. कथा पोपटरावांची, बालाघाटचा सिंह या चरिञ ग्रंथाचे लेखन सुध्दा त्यांनी केले. छञपती संभाजी महाराज यांनी संस्कृत भाषेत लिहिलेला बुधभूषण हा अत्यंत दुर्मिळ व महत्त्वपूर्ण बुधभूषण हा ग्रंथ मराठी भाषेत काव्य अनुवादित केला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचा जाज्ज्वल्य इतिहास नव्या पिढीसमोर आणण्याचा त्यांचा मानस आहे. थ्री डी माध्यमाचा वापर करून भव्य चित्रपटाची निर्मिती करण्याचे गोरे यांचे स्वप्न आहे.