होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शक्‍ती मिलचा बाल गुन्हेगार बनला ‘मुंबईचा भाई’!

शक्‍ती मिलचा बाल गुन्हेगार बनला ‘मुंबईचा भाई’!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

तू मला ओळखत नाहीस काय भ..? मी इथला भाई आहे. तुझी हिंमत कशी झाली, मला जाब विचारायची? असा दम भरत शक्ती मिल सामूहिक बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी आकाश जाधव याने साथीदारांच्या मदतीने 48 वर्षीय व्यक्तीला जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री दीड वाजता घडली. जाधव एवढ्यावरच थांबला नाही. पोलिसांकडे गेलास किंवा कोणाला काही सांगितलेस तर जीवे ठार मारून टाकू अशी उघड धमकी देऊन तो  पसार झाला. आग्रीपाडा पोलिसांनी जाधव याच्यासह त्याच्या साथीदारांना बेड्या ठोकल्या आहेत. 

सातरस्ता परिसरात राहणारे बाळाराम कदम (48) हे दादरच्या प्रीतम हॉटेलमध्ये नोकरी करतात. कदम यांना घरी परतण्यासाठी रात्रीचा एक, दीड वाजतोच. 29 मार्चच्या रात्री दीडच्या सुमारास ते घरी परतत असताना  आकाश जाधव हा साथीदार आकाश गडकरी आणि सिध्देश तोंडवळकर उर्फ गोपू याच्यासोबत दारु पित बसल्याचे त्यांना दिसले. कदम हे शांतपणे  जाणार तेवढ्यात जाधवने त्यांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केेली. कदम यांनीही त्याला जाब विचारताच ‘तू मला ओळखत नाहीस काय भ..? मी इथला भाई आहे. तुझी हिंमत कशी झाली मला जाब विचारण्याची?’ असे म्हणून गडकरी आणि तोंडवळकर यांनी कदम यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. कदम यांच्या नाका-तोंडातून रक्त वाहू लागले. रक्तबंबाळ अवस्थेत कदम यांनी फोन करुन आपल्या दोन्ही मुलांना बोलवून घेतले.  मुलांनी त्यांना नायर रुग्णालयात दाखल केले. 


  •