Wed, Nov 21, 2018 21:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शाहू महाराज शिष्यवृत्ती न देणार्‍या कॉलेजवर कारवाई

शाहू महाराज शिष्यवृत्ती न देणार्‍या कॉलेजवर कारवाई

Published On: Jul 25 2018 1:37AM | Last Updated: Jul 25 2018 1:30AMमुंबई : प्रतिनिधी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेची अंमलबजावणी न करणार्‍या महाविद्यालयांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. शिक्षणशुल्काच्या केवळ 50 टक्के इतकी रक्‍कम विद्यार्थ्यांकडून घ्यावी, अन्य 50 टक्के रक्‍कम सरकार देणार आहे. परंतु, काही महाविद्यालयांमध्ये 100 टक्के शुल्क विद्यार्थ्यांकडून घेण्यात येत असल्याच्या तक्रारी प्राप्‍त झाल्या असून, अशा संस्थांविरुद्ध नियमानुसार तत्काळ कारवाई करण्यात येणार आहे,  असे त्यांनी स्पष्ट केले. 

8 लाखांपेक्षा कमी उत्पन्‍न असलेल्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांकडून पूर्ण फी घेणे बेकायदेशीर आहे. महाविद्यालयांनी 50 टक्क्यांपेक्षा जास्त शुल्क आकारू नये, असे आदेश सर्व महाविद्यालयांना आणि शैक्षणिक संस्थांना यापूर्वीच देण्यात आलेले आहेत. तरीही विद्यार्थ्यांकडून अधिक शुल्क घेतले असल्यास अथवा कोणत्याही विद्यार्थ्याची फसवणूक झाली असल्यास, त्या विद्यार्थ्यांनी विभागीय नोडल अधिकार्‍यांकडे आपली तक्रार नोंदवावी, असे आवाहन तावडे यांनी केले.  

मराठा समाजाने जसे शांतपणे मोर्चे काढले, तसे जगात कोणीही काढले नाहीत. गेल्या अनेक वर्षांत राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडी सरकारने मराठा समाजासाठी केवळ घोषणा केल्या, असा आरोप तावडे यांनी केला.