Sun, Nov 18, 2018 13:52होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बाबा कुठेही गेलेले नाहीत, शौर्याच्या रुपाने ते आपल्यातच आहेत

बाबा कुठेही गेलेले नाहीत, शौर्याच्या रुपाने ते आपल्यातच आहेत

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

माटुंगा : वार्ताहर

‘आमच्या वडीलांचा मला अभिमान असून त्यांची उणीव 9 वर्षे पूर्ण झाल्यानंतरही भरुन निघालेली नाही. त्यावेळचा प्रत्येक क्षण अगदी आजही जीवंत वाटतो.  देशासाठी बलिदान दिल्यानंतरच्या काळात अनेक अनोळखी माणसे घरी भेट देतात. बाबांबद्दल आदराने विचारतात, यामुळे ते कुठेही गेलेेले नाहीत. त्यांच्यामधील शौर्याच्या रुपाने ते आपल्यामध्येच आहेत.” अशा शब्दांत पाणावलेल्या डोळ्यांनी शहीद तुकाराम ओंबळे यांच्या कन्या वैशाली यांनी दै.पुढारीशी बोलताना शहीद ओंबले यांच्या आठवणींना उजाळा दिला.

शहीद तुकाराम ओंबळे यांच्या वरळी येथील निवासस्थानी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचे कटू अनुभव जाणून घेतले. वरळीच्या पोलीस कॅम्पमध्ये शहीद ओंबळे यांच्या पत्नी, दोन मुली  राहतात. दोन मुली विवाहीत असून छोटी सेल्स ऑफिसर आहे. नोकरीत व्यस्त असतानाही बाबा आम्हाला खूप वेळ द्यायचे, अशी आठवणही वैशाली यांनी सांगितली.

जगात पैशापेक्षा माणूस, त्याच्या भावना महत्त्वाच्या आहेत. त्यामुळेच एक 80 वर्षांचे गृहस्थ दरवर्षी न चुकता दिवाळीच्या पहिल्या दिवशी घरी येतात. बाबांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होतात. महाबळेश्वरमधील  खेड, आंबे हे आमचे गाव. तिथेच वडील लहानाचे मोठे झाले. दहावी पर्यंतचे  शिक्षण घेतल्यावर पोलीस दलात भरती झाले. 31 वर्षे सेवा करुन दहशतवाद्यांशी दोन हात करताना शहीद झाले. अशा आठवणी सांगून ओंबळे  कुटुंबीयांनी देशासाठी लढणार्‍या सर्वच पोलिसांना, सैनिकांना आदरांजली वाहिली.